जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Wedding Video Viral : वाजतगाजत वरात घेऊन मंडपात आला; वधूपक्षाने नवरदेवाला बांधलं झाडाला कारण...

Wedding Video Viral : वाजतगाजत वरात घेऊन मंडपात आला; वधूपक्षाने नवरदेवाला बांधलं झाडाला कारण...

लग्नात नवरदेवाला बांधलं (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

लग्नात नवरदेवाला बांधलं (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

नवरीसोबत सात फेरे घ्यायला आलेल्या नवरदेवाला वधूपक्षाने झाडाला बांधल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 15 जून :  नवरदेव वाजतगाजत वरात घेऊन मंडपात आला. नवरीसोबत लग्ना च्या काही विधीही पार पडल्या. पण लग्नाच्या मध्येच नवरदेवाने अशी डिमांड केली की वधूपक्ष पुरता हादरला. त्यानंतर लग्नातील सात फेरे कसले नवरदेवाला वधूपक्षाने चक्क झाडालाच बांधलं. लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे. जौनपूर जिल्ह्यातील पूर्वा गावातील नवरदेव आपल्या नवरीला घेण्यासाठी प्रतापगडच्या हरखपूर गावात आला. 14 जूनला हे लग्न होतं. लग्न म्हटलं की कोणत्या ना कोणत्या कारणावरून छोटे-मोठे वादही होतात. असाच वाद या लग्नातही झाला होता. वधू आणि वरात वरमालाआधी भांडण झालं होतं. हे भांडण शांत झालं नाही तोच वराने भलतीच डिमांड केली. त्यानंतर मात्र वधूपक्षाने त्याला झाडाला बांधलं.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने वराला लोकांनी दोरीने झाडाला बांधलं आहे. फक्त नवरदेवच नव्हे तर त्याच्यासोबत आलेल्या वऱ्हाड्यांनाही नवरदेवाची मागणी महागात पडली. त्यांनाही वधूपक्षाने ओलीस ठेवलं. Wedding Video Viral : वरात दारात येताच उत्साही नवरी धावत बाल्कनीत गेली; पुढे असं काही घडलं की… आता तुम्ही म्हणाल नवरदेवाने असं नेमकं मागितलं तरी काय? की त्याला बांधण्यात आलं. तर त्याने हुंडा मागितला. भारतात हुंडा कायद्याने गुन्हा आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या नवरदेवाने हुंडा मागताच नवरीच्या पालकांना धक्काच बसला. त्यांनी वरासह त्याच्या कुटुंबाला समजण्याचा प्रयत्न केला. पण ते हुंडा घेण्यावर ठाम राहिले. त्यानंतर मात्र वधूकडील मंडळींचा संयम सुटला आणि त्यांनी असं पाऊल उचललं की सर्वांनाच धक्का बसला. शंख घरी विसरल्याने गुरुजींनी केली ‘ही’ युक्ती; लग्नाचा व्हिडिओ तुफान VIRAL @Sisodia19Rahul नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

जाहिरात

मीडिया रिपोर्टनुसार यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना नवरदेवाची सुटका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात