नवी दिल्ली, 01 एप्रिल : काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत. काही जणांच्या आता सुरू झाल्या आहेत. परीक्षेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की याला त्याला विचारणं किंवा काहीतरी लिहायचं म्हणून लिहून टाकणं, असं अनेकांनी केलं असेल. पण काही विद्यार्थी तर त्याच्याही पलिकडे जातात. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दूरच. पण त्याऐवजी असं काही लिहितात की कुणी कधी विचारही केला नसेल. अशाच एका परीक्षेतील उत्तरपत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
बऱ्याचदा विद्यार्थी उत्तरपत्रिकेत असं काही लिहितात की हसू आवरत नाही. अशीच ही उत्तरपत्रिका ज्यात विद्यार्थ्याने अतरंगी काहीतरी उत्तर दिलं आहे. या परीक्षेत प्रदूषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. प्रदूषण कसं टाळता येईल, असा हा प्रश्न. या प्रश्नावर विद्यार्थ्याने उत्तर दिलं आहे. त्याने सुरुवात तर अगदी चांगली केली आहे. उत्तर वाचताना वाटतं, विद्यार्थ्याला याचं योग्य उत्तर येतं आहे. पण जसजसं उत्तर वाचात तुम्ही पुढे जाल, तर डोक्यावर हात माराल.
विद्यार्थ्याने उत्तराची सुरुवात आणि शेवट अगदी बरोबर केला आहे. पण मध्यभागी त्याने जे लिहिलं ते शॉकिंग आहे. असं या विद्यार्थ्याने काय लिहिलं आहे तुम्ही वाचा.
...अन् बाईंचा सुटला ताबा; स्टेजवर येत शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना 'चुम्मा'; VIRAL झाला VIDEO
उत्तराची सुरुवात अशी की.... 'वाहनांमधून निघणारा धूर आणि कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी आणि प्रदूषित हवा कमी केली तरच प्रदूषण टाळता येईल. उत्तराच्या मध्येच या विद्यार्थ्याने फिल्मी गाणं लिहिलं आहे. 'बहुत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो खुदा की कसम' या गाण्याच्या ओळी लिहिल्या. तर ही खबरदारी घेतली तरच प्रदूषण टाळता येईल, असा त्याने उत्तराचा शेवट केला आहे.
ही उत्तरपत्रिका कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्याची आणि कुठल्या शाळेतील आणि कधीची आहे ते माहिती नाही. पण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
VIDEO - मुलाच्या शाळेत गोळीबाराचं LIVE Reporting करत होती आई; लेकाबाबतच असं काही समजलं की...
आता अशी उत्तरपत्रिका वाचून तुमचं डोकं गरगरलं असेल. विचार करा ज्या शिक्षकाच्या हातात ही उत्तरपत्रिका गेली असेल त्याचं काय झालं असेल. हे उत्तर वाचून नक्की तो शिक्षक बेशुद्ध झाला असेल किंवा कोमात गेला असेल.
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणी परीक्षेत अशी उत्तरं लिहिली होती का? आणि काय? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.