मराठी बातम्या /बातम्या /Viral /हर एक फ्रेंड....! लग्नात टॉयलेट क्लीनर, डस्टबीन अन् ब्रश कोण गिफ्ट करतं? वधूवर हताश; पाहा भन्नाट VIDEO

हर एक फ्रेंड....! लग्नात टॉयलेट क्लीनर, डस्टबीन अन् ब्रश कोण गिफ्ट करतं? वधूवर हताश; पाहा भन्नाट VIDEO

जवळपास अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मित्रपरिवार नाचतनाचत नवदाम्पत्याला गिफ्ट देत आहेत. प्रत्येकजण आळीपाळीने येऊन त्यांना गिफ्ट देत आहेत.

जवळपास अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मित्रपरिवार नाचतनाचत नवदाम्पत्याला गिफ्ट देत आहेत. प्रत्येकजण आळीपाळीने येऊन त्यांना गिफ्ट देत आहेत.

जवळपास अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मित्रपरिवार नाचतनाचत नवदाम्पत्याला गिफ्ट देत आहेत. प्रत्येकजण आळीपाळीने येऊन त्यांना गिफ्ट देत आहेत.

मुंबई, 23 मे: प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही मित्र असतात ते जीवाला जीव देणारे असतात, आयुष्यात आनंद निर्माण करणारे असतात. कधी कधी हे मित्र असं काही करतात की त्यावर हसावं की रडावं काहीच कळत नाही. त्यातूनही ते आनंदच देऊन जातात. शिवाय ग्रुपमध्ये एखाद्याचं लग्न असेल तर त्याची गंमत करण्याची आयती संधीच उर्वरित मेंबर्सना मिळते. भारतीय लग्नांमध्ये (Indian Wedding) घडणाऱ्या गमतीजमती काही वेगळी गोष्ट नाही. मानपमानापासून अनेक भन्नाट किस्से भारतीय लग्नात घडत असतात. आणि बऱ्याचदा तुमचे मित्र या घटनांचे महत्त्वाचे भाग असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही मित्रमैत्रिणी नवविवाहित दाम्पत्याला गिफ्ट देत आहेत.

आता तुम्ही म्हणाल यात काय व्हायरल (YouTube Viral Video) होण्यासारखं? पण व्हिडीओही तसाच आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये या नवरानवरीचा संपूर्ण मित्रपरिवार नाचतनाचत नवदाम्पत्याला गिफ्ट देत आहे. प्रत्येकजण आळीपाळीने येऊन त्यांना गिफ्ट देत आहेत. आणि यातील गमतीशीर बाब म्हणजे त्यांनी दिलेले गिफ्ट्स साधीसुधे नाहीत तर फारच कमाल आहे. कुणी टॉयलेट क्लीनर देतंय, कुणी शॅम्पू, कुणी टूथपेस्ट आणि ब्रश तर कुणी झाडू. अगदी डस्टबीनही या मित्रांनी दिला आहे. बिचाऱ्या नवरानवरीला त्यांचे गिफ्ट्स स्वीकारण्यापासून काही पर्यायच राहिलेला नाही आहे.

पाहा व्हिडीओ:

" isDesktop="true" id="554677" >

हे वाचा-VIDEO: कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं, मनसोक्त थिरकले रुग्ण

हे नवदाम्पत्यही या व्हिडीओत त्यांच्या मित्रांचा प्रताप एन्जॉय करताना दिसत आहेत. शेवटी दोघंही यामध्ये त्यांच्याबरोबर नाचू लागतात. युट्यूबवर Wedding Funn Gift Viral Video नावाने हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर आलेल्या प्रतिक्रिया देखील कमाल आहेत.

First published:

Tags: Live video viral, Video viral