जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं, मनसोक्त थिरकले कोरोना रुग्ण

VIDEO: कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं, मनसोक्त थिरकले कोरोना रुग्ण

VIDEO: कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं, मनसोक्त थिरकले कोरोना रुग्ण

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की कोरोना रुग्णांचा (Corona Patients) तणाव कमी करणं हा त्यांच्यावरील उपचारातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, रुग्णालयांमधील डॉक्टर आणि नर्स गाणं गात आणि डान्स करत रुग्णांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (2nd Wave of Coronavirus) संपूर्ण देशभरात थैमान घातलं. या विषाणूनं अनेक कुटुंब उद्धवस्त केली. अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली. या परिस्थितीमध्ये आरोग्य कर्मचारी (Health Workers) दिवसरात्र काम करुन रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की कोरोना रुग्णांचा (Corona Patients) तणाव कमी करणं हा त्यांच्यावरील उपचारातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, रुग्णालयांमधील डॉक्टर आणि नर्स गाणं गात आणि डान्स करत रुग्णांचं मनोरंजन करण्याचा आणि त्यांची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा अनेक घटनांचे व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या समोर येत आहे. यात आरोग्य कर्मचारी सुशांत सिंह राजूपतच्या केदारनाथ सिनेमातील नमो, नमो हे गाजलेलं गाणं गाताना दिसत आहेत. पीपीई कीट घालून रुग्णालयातील स्टाफनं गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. हा व्हिडिओ बराच शेअर केला गेला आहे.

जाहिरात

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आरोग्य कर्मचारी गिटार वाजवताना दिसत आहेत. तसंच पीपीई कीट घालून अमित त्रिवेदीचं गाणं गाताना दिसत आहेत. स्टाफचे हे सदस्य गाणं गात असताना रुग्णदेखील आपल्या वेदना विसरुन या गाण्यावर थिरकत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या कोरोनामुळे देशभर चिंतेचं वातावरण पसरलेलं असताना हा दिलासा देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून आपल्या कामासोबतच माणुसकीही जपणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांचं चांगलंच कौतुक होतं आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात