Wedding Video: भारतात लग्नांचा सीजन सुरू आहे. यादरम्यान नवरा-नवरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल (Video Viral On Social Media) मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीपासून खाण्या-पिण्यात नवनव्या पद्धतींचा अंतर्भाव केला जातो. लग्नाची खूप मोठी प्लानिंग केली जाते. अगदी प्री-वेडिंग शूटचाही घाट घातला जातो. यादरम्यान घडलेले अनेक क्षण मजेशीरही असतात. नवरीला पाहून नवरदेवाने दिलं असं रिअॅक्शन.. व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्नातील आहे. लग्नाच्या (जयमाला) विधींना सुरुवात होण्यापूर्वी नवरीची स्टेजवर एन्ट्री होते. स्टेजवर येण्यापूर्वी नवरी हॉलमध्ये नाचत नाचत एन्ट्री करते. तर नवरदेव स्टेजवर उभा आहे. नवरदेव जेव्हा आपल्या नवरीला पाहतो तेव्हा तो असं काही करतो की,सर्वजण नवरदेवाकडे पाहू लागतात. व्हिडीओमध्ये सर्वात आधी नवऱ्याच्या दिशेने कॅमेरा असतो. आपल्या नवरीला पाहताच भावनेच्या भरात एका हाताची दोन बोटं तोंडात टाकून शिटी वाजवतो. अनेकदा रस्त्यांवर अशा प्रकार शिटी वाजवणारी मुलं तुम्ही पाहिली असतीव. लग्नात तर नवरदेव नवरीला पाहून इतका खूष होतो आणि शिटी वाजवतो.
नवरीसोबत नवरदेवाचा डान्स… व्हिडीओमध्ये यानंतर नवरीचा सीन दिसतो. जी आपल्या मैत्रिणींसह डान्स करताना दिसत आहे. यानंतर नवरदेवही आपल्या नवरीकडे जातो आणि तिचा हात पकडून डान्स करू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.