जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - मित्रांनी नवरदेवासमोर दिलेलं गिफ्ट पाहून लाजली नवरीबाई; नेटिझन्स म्हणाले, 'काम की चीज'

VIDEO - मित्रांनी नवरदेवासमोर दिलेलं गिफ्ट पाहून लाजली नवरीबाई; नेटिझन्स म्हणाले, 'काम की चीज'

VIDEO - मित्रांनी नवरदेवासमोर दिलेलं गिफ्ट पाहून लाजली नवरीबाई; नेटिझन्स म्हणाले, 'काम की चीज'

लग्नात मिळालेलं असं गिफ्ट पाहून नवरीसह नवरदेवही शॉक झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 फेब्रुवारी : लग्न (Wedding video) म्हणजे नवरा-नवरीला शुभेच्छांसह गिफ्टही (Wedding gift video) आलेच. त्या दोघांच्या नव्या संसाराला उपयोगी ठरतील किंवा त्यांना आवडतील अशा वस्तू त्यांना दिल्या जातात. लग्नाच्या गिफ्टचे असे बरेच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी त्यांना विचित्र गिफ्ट देताना दिसले. अगदी लहान बाळाच्या बाटलीपासून ते किचनमधील लाटण्यापर्यंतचा यात समावेश होता. पण आता अशा गिफ्टचा व्हिडीओ समोर आला आहे, जे विचित्र आहे पण तितकंच कामाचंही आहे. एका लग्नाचा हा व्हिडीओ ज्यात नवरा-नवरीला गिफ्ट दिले जात आहे. मित्रांनी नवरदेवासमोर नवरीबाईला एक गिफ्ट दिलं आणि तिला ते तिथंच भरमंडपात सर्वांसमोर उघडायलाही लावलं. ते गिफ्ट पाहून नवरीबाई लाजेने गुलाबी झाली, नवरदेवही लाजला. व्हिडीओत पाहू शकता नवरीबाईच्या हातात एक मोठा बॉक्स आहे, जो तिला गिफ्ट म्हणून फ्रेंड्सनी दिला आहे. ती घाईघाईत तो बॉक्स खोलते. बॉक्समधून एक पाकिट बाहेर पडतं. ते पाकिट ती खोलते. बरेच पेपर गुंडाळलेले आहेत. एकेएक करून ती सर्व पेपर काढते आणि पाहते तर काय? हे असं गिफ्ट. हे वाचा -  अरे बापरे! डान्स करणार तोच…; नवरा-नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL बॉक्समध्ये नेमकं गिफ्ट काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता नवरीसह नवरदेव आणि तिथं उपस्थित असलेल्या इतर लोकांनाही असते. त्या सर्वांचं लक्ष त्या बॉक्सकडे होतं. पण त्या बॉक्समधून शेवटी नवरीच्या हातात जे गिफ्ट येतं ते पाहून सर्वजण हैराण होता.

जाहिरात

नवरीबाईला गिफ्ट म्हणून एवढ्या मोठ्या मास्कमधून चक्क मास्क दिलेले असतात. ती आपल्या हातात सर्जिकल मास्क घेऊन सर्वांना दाखवते. त्याचवेळी तिला आणि नवऱ्यालाही हसू आवरत नाही. दोघंही खळखळून हसतात. हे वाचा -  स्विमिंग पुलजवळ मस्ती पडली महागात; नवरीसह मैत्रिणीही पाण्यात कोसळल्या, VIDEO हा व्हिडीओ पाहताना या नवरीबाईला काय गिफ्ट मिळालं असेल हे पाहण्यासाठी नेटिझन्सनी आतूर झाले होते. ते बॉक्समध्ये काय असावं याचा त्यांनी अंदाजही बांधला. पण त्यांचा अंदाज फेल ठरला. पण शेवटी जे गिफ्ट दिसलं ते कामाचं आहे, हेदेखील युझर्स सांगायला विसरले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात