Home /News /viral /

क्युट दिराला पाहताच स्वतःला आवरू शकली नाही नवरी; लग्नातच नवरदेवाच्या नकळत...; VIDEO VIRAL

क्युट दिराला पाहताच स्वतःला आवरू शकली नाही नवरी; लग्नातच नवरदेवाच्या नकळत...; VIDEO VIRAL

नवरीबाईच्या या दिराला पाहून तर तुम्हीसुद्धा फिदा व्हाल.

  मुंबई, 04 ऑक्टोबर : दिर आणि वहिनीचं (Devar Bhabhi) बाँडिंग वेगळंच असतं. त्यातही दिर वहिनीपेक्षा (Devar Bhabhi video) लहान असेल तर मग विचारायलाच नको. अशाच एका आपल्यापेक्षा लहान दिरावर वहिनीचा जीव जडला. लग्नात क्युट दिराला पाहताच नवरीबाई त्याच्यावर फिदा झाली आणि नवरदेवाच्या नकळतच ती त्याला इशारे करू लागली. दिरसुद्धा तिच्याकडे एकटक पाहत होता. वहिनी-दिराचा हा लग्नातील क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर  (Social Media)  व्हायरल होतो आहे. ज्यात दिराला पाहताच वहिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज पाहायला मिळतं. तिचा दिर इतका गोंडस आहे की नवरीच काय तुम्हीसुद्धा पाहाल तर त्याच्यावर फिदा व्हाल.
  व्हिडीओत पाहू शकता, नवरी आपल्या नवरदेवासोबत एका सोफ्यावर बसली आहे. त्यांचं फोटोसेशन सुरू आहे. सोफ्याशेजारीच एक गोड चिमुकला उभा आहे आणि हा चिमुकला म्हणजे तोच नवरीचा दिर ज्याच्याबद्दल तुम्ही मघासपासून वाचत होता. हे वाचा - स्टेजवरच मेहुणीनं पकडला दाजीचा हात अन्...; VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं हा छोटासा दिर तिथं उभा राहून आपल्या वहिनीकडे टकामका पाहतो आहे. त्याला पाहून नवरीसुद्धा त्याच्या प्रेमात पडते. ती त्याला आपल्या शेजारी सोफ्यावर बसायला बोलवते. ती त्याला हाताने इशारे करते. पण दिर काही तिच्याजवळ जायला तयार नाही. तो तिथंच उभा राहून वहिनीकडे पाहत राहतो.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या