मुंबई, 06 जानेवारी : तुम्ही फुडी असाल तर वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याशिवाय तुम्हाला खाण्याची स्पर्धाही खेळायला आवडत असेल. कोण किती खातं अशी स्पर्धा आपण आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत लावतोच. पण अगदी सोशल मीडियावरही असे फूड चॅलेंज व्हायरल (Viral Food Challenge) होत असतात. असंच फूड चॅलेंज एका तरुणीने घेतलं. एकाच वेळी तब्बल 100 मोमोज खाण्याचं चॅलेंज तिने घेतलं (100 Momos eating challenge). ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आपल्याला एखादा पदार्थ आवडत असला तर आपण तो कितीही खाऊ शकतो, असंच प्रत्येकाला वाटतं. या तरुणीलाही असाच आत्मविश्वास होता. तिने चक्क 100 मोमोज खाण्याचं चॅलेंज घेतलं. माधुरी लाहिरी असं या तरुणीचं नाव आहे. ती युट्युबर आहे (YouTuber Madhuri Lahiri). मॅडी इट्स युट्युब अकाऊंटवर तिचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता माधुरीसमोर एक भलंमोठं ताट आहेत. त्यात इतके मोमोज आहेत जे पाहूनच आपलं पोट भरतं. ताटातील मोमोजची संख्या एकून 100 आहे. आता फक्त ताट पाहूनच आपलं पोट भरलं तर ही तरुणी हे चॅलेंज पूर्ण करेल का? तुम्हाला काय वाटतं. चला पाहुयाचं. हे वाचा - कमालच झाली! चक्क एका माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO माधुरी एकएक करत बकाबका मोमोज खाते. पाहता पाहता ती निम्म्याहून अधिक ताट रिकामं करते. ही जिंकेल की काय असंच वाटतं. पतिचं पोट भरतं, तरी ती चॅलेंज जिंकण्यासाठी तोंडात मोमोज भरत जाते. पण कितीही प्रयत्न केले तरी ती पूर्ण ताट काही रिकामं करू शकत नाही.
आपण आता फुटणार आहोत, असं वाटतं आहे, असं ती या व्हिडीओत सांगताना दिसते. माधुरीने अखेर हार पत्करली. तिच्या ताटात 20-25 मोमोज शिल्लक राहिले. हे वाचा - VIDEO: Birthday आहे रेड्याचा, जल्लोष साऱ्या गावाचा अन् खर्च झाला लाखाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी तिला आरोग्याच्या दृष्टीने सल्ला दिला आहे. इतकी कॅलरी हेल्दी नाही, जंक फूड खाल्ल्याे ती आजारी पडेल. असं म्हटलं आहे. तर काही फूड लव्हर्सनी मात्र तिला खाताना पाहून आपल्यालाही मोमोज खाण्याची इच्छा झाल्याचं म्हटलं.