Home /News /viral /

मित्र असावा तर असा! हा WEDDING VIDEO पाहिल्यानंतर नवरदेवाऐवजी त्याच्या मित्राचीच होतेय चर्चा

मित्र असावा तर असा! हा WEDDING VIDEO पाहिल्यानंतर नवरदेवाऐवजी त्याच्या मित्राचीच होतेय चर्चा

नवरदेवाच्या मित्राने लग्नात तर कमालच केली.

  मुंबई, 06 जानेवारी : लग्न (Wedding video) म्हटलं की चर्चेत असात ते नवरा-नवरी (Bride groom video). पण लग्नाचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात वर-वधूऐवजी नवरदेवाच्या मित्राचीच चर्चा होते आहे (Groom friend video). नवरा-नवरी बाजूलाच राहिले. नवरदेवाच्या मित्रानेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नवरदेवाच्या या मित्राचीच चर्चा होऊ लागली आहे. त्याच लोक कौतुक करत आहेत. आता मित्राचं लग्न म्हटलं की मित्र त्याला त्रास देण्याची, त्याला छेडण्याची एक संधी सोडत नाही हे काही तुम्हाला नवीन सांगण्याची गरज नाही. कदाचित तुम्ही तुमच्या लग्नात याचा अनुभव घेतला असेल किंवा तुम्ही तुमच्या मित्राच्या लग्नात काही ना काही खोडकरपणा केला असेल. पण जेव्हा नवरदेवाला गरज पडते, तेव्हा एरवी त्याची मजा घेणारे हेच मित्र त्याच्या मदतीसाठी धावून येतात. असाच हा व्हिडीओ आहे. प्रत्येकाने आपल्या मित्राला हा व्हिडीओ टॅग केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही तुमच्या मित्राला हा व्हिडीओ पाठवल्याशिवाय राहणार नाही. मित्र असावा तर असा, असंच तुम्ही म्हणाल. आता असं या मित्राने नेमकं केलं तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? जिवंत बेडकाच्या पोटात पेटते लाइट; VIDEO VIRAL लग्नाचा हा जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो वरमाला घालतानाचा क्षण आहे. वरमाला घालताना तुम्हाला माहितीच असेल की नवरा आणि नवरीकडील मित्रमैत्रिणी, नातेवाईक त्यांना उचलून धरतात आणि मग वरमाला घालण्याची स्पर्धा रंगते. तशीच स्पर्धा इथंही रंगली. वरमाला घालताना नवरीबाईला तिच्या नातेवाईकांनी उंच उचलून धरलं आहे. नवरीबाई त्याला वरमाला घालण्याचा इशारा करते. पण बिच्चारा नवरदेव त्याच्या बाजूने त्याला उचलण्यासाठी कुणीच नव्हतं.
  नवरीला आता वरमाला घालायची कशी असा प्रश्न त्याला पडतो. दुःखी चेहरा करत तो मागे पाहतो. त्याच्या मागे फक्त एक मित्र उभा असतो. ज्याची शरीरयष्टी पाहिली तर नवरदेवापेक्षा तो खूपच बारीक आहे. तो एकटा काही नवरदेवाला उचलूच शकणार नाही, हे पाहताच आपण सांगू शकतो. हे वाचा - कमालच झाली! चक्क एका माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO पण त्याच्या शरीरयष्टीवर जाऊ नका बरं का? त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास तर पाहा. नवरीबाईला वर उचलतात तो तिच्याकडे पाहतो आणि त्याच्याकडे पाहणाऱ्या नवरदेवाला तूपण तयार हो असंच तो खुणावतो.  आता खरा ट्विस्ट. नवरदेवाचा हा हडकुळा मित्रच एकटा त्याच्या मदतीला येतो. एकटाच तो त्याला उचलून धरतो. आधी नवरदेवाची फजिती पाहणाऱ्या नवरीबाईलाही हे पाहून झटकाच बसतो. ती आ वासून पाहत राहते आणि नवरदेव हसत हसत तिला वरमाला घालतो. भले हा मित्र शरीराने कमजोर असेल. पण जेव्हा मित्राच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्या मैत्रीतील प्रेम आणि मैत्रीची ताकद जिंकते.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या