जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फ्रीच्या ऑफर्सपासून सावधान, कुपन घेऊन केस कापायला गेलेल्या तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

फ्रीच्या ऑफर्सपासून सावधान, कुपन घेऊन केस कापायला गेलेल्या तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

फ्रीचं कुपन घेऊन पोहोचला केस कापायला, सलून वाल्यांनी इतकं बिल लावली की घ्यावं लागलं लोन

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : अनेकदा थोरा-मोठ्यांकडून फ्रीच्या गोष्टींपासून नेहमी लांब राहण्याचा सल्ला मिळतो. पण कधी-कधी थोड्याशा पैशांसाठी मन लालची होतं आणि आपण्या त्या गोष्टींच्या मागे जातोच. पण हल्ली मोफत सेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे फ्री ऑफर्स आणि कुपनच्या मागे जाण्यापूर्वी आपल्याला सावधान राहाणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला कंगाल करायला देखील लोक मागेपुढे पाहणार नाहीत, असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. चीनमधून हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या एका मित्राने 230 रुपयांचे मोफत हेअर कटिंग व्हाउचर दिले होते. हे व्हाउचर मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. या व्यक्तीचे नाव ली आहे. ली जेव्हा केस कापण्यासाठी गेला तेव्हा पहिल्या केस कापण्याआधी त्याला सलूनमध्ये हेड मसाज देण्यात आला. पेट्रोलवर चालणारी कार कोणत्या स्पीडवर देते Best Mileage, तुम्हाला माहितीय का ही ट्रिक? डोक्याला मसाज देण्यापूर्वी लीचा चष्मा काढण्यात आला. लीने सांगितले की, ‘‘मला वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने लागू करण्यात आली आणि नंतर मला दर यादी दाखवण्यात आली.’’ चष्म्याअभावी लीला सर्व काही अस्पष्ट दिसत होते. त्यामुळे ली ला तेथील रक्कम काही दिसली नाही. अखेर वेगवेगळे उत्पादने वापरुन काही सेवा लीला पुरवला गेल्या आणि मग त्याला भलंमोठं चार्ज लावून फसवणूक करण्यात आली. सापाचे Unknown Fact, मेलेल्या सापाचं विष किती धोकादायक? लीनं जेव्हा बिल पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याला 57 हजार रुपयांचे बिल देण्यात आले. त्याने विरोध करून माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगताच सलूनचे सर्व कर्मचारी जमले आणि त्याला धमकावू लागले. लीचा फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि त्या फोनवरुन क्रेडिटकार्ड वापरुन 57 हजार रुपयांचे लोन घेतले. या घटनेनंतर ली तेथून निघाला आणि त्याने पोलीसात तक्रार दाखल केली. ही बाब निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणानंतर संबंधित सलून आता बंद आहे. पोलिस अधिकारी या केसचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात