जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! बायकोचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवास; कोणतं आहे हे ठिकाण?

बापरे! बायकोचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवास; कोणतं आहे हे ठिकाण?

व्हायरल

व्हायरल

अनेकवेळा आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या खास दिवसांच्या तारखा विसरत असतो. यामुळे अनेक लोकांमध्ये भांडणेदेखील होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : अनेकवेळा आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या खास दिवसांच्या तारखा विसरत असतो. यामुळे अनेक लोकांमध्ये भांडणेदेखील होतात. नवरा बायकोमध्ये हे खूप वेळा पहायला मिळतं. असे अनेक किस्से असेही आले आहेत की वाढदिवस आठवला नाही तर बायको घरातून निघून जाते. कधी कधी ते महिनोन्महिने बोलत नाहीत. मात्र असा एक देश आहे जिथे पत्नीचा वाढदिवस विसरणे गुन्हा आहे. यासाठी तुरुंगवासही होतो. हे नेमकं काय प्रकरण आहे याविषयी जाणून घेऊया. आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले हे बेट आपल्या विचित्र कायद्यामुळे नेहमीच चर्चेत असते. याचं नाव आहे सामोआ. येथील कायदे अतिशय कडक असून त्यांचे पालनही अत्यंत काटेकोरपणे केले जाते. इथे जर नवरा चुकून बायकोचा वाढदिवस विसरला तर तो मोठा गुन्हा मानला जातो. जर पती पहिल्यांदा पत्नीचा वाढदिवस विसरला तर त्याला इशारा दिला जातो. पुढच्या वेळी तीच चूक पुन्हा केल्यास त्याला दंड भरावा लागेल किंवा तुरुंगात जावे लागेल.पत्नीने तक्रार केल्यास पतीला पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. हेही वाचा -  लेकीसाठी स्थळ शोधणाऱ्या वडिलांची फजिती, घरी आलेल्या त्या व्यक्तीला…. सामोआमध्ये केवळ विचित्र कायदे नाहीत. जगात असे अनेक देश आहेत जिथे असे कायदे आहेत जे जाणून तुम्ही हसाल. यातील अनेक कायदे दशके जुने आहेत, जे आजही बदललेले नाहीत. उत्तर कोरियात जर तुम्ही निळी जीन्स घालून बाहेर गेलात तर ते बेकायदेशीर मानले जाते.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, असे अनेक देश आहेत जिथे वेगवेगळे कायदे आणि परंपरा आहेत. याविषयी अनेकांना माहित नसतं. आपण विचारही केला नसेल असे कायदे आणि परंपरा असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात