नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : प्रत्येक आई-वडिल आपल्या मुला-मुलीच्या लग्नासाठी उत्सुक असतात. आपल्या मुला-मुलीला योग्य स्थळ मिळावं यासाठी प्रयत्न करतात. कधी कधी या उत्साहाच्या भरात काही चुकाही होतात. असाच काहीसा किस्सा सध्या समोर आला असून याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ट्विटर यूजर हर्षा रामचंद्र यांनी या घटनेवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं, माझे लग्न करण्यासाठी आईने वडिलांना कोणालातरी कॉल करण्यास किंवा ऑनलाइन पाहण्यास सांगितले. दरम्यान, त्याचा फोन आला आणि त्याने तिला घरी बोलावले. वडिलांनी सांगितले की कोणीतरी मुलगा भेटायला येत आहे. हे ऐकून आई खवळली. तेवढ्यात एक काका टाईप मुलगा घरी आला. माझ्या वडिलांनी त्याला आत बोलावून चहा दिला. पाहुणचार पाहून तो माणूस विचारात हरवून गेला की हे काय चाललंय. शेवटी त्या माणसाने वडिलांना विचारले - तुम्ही किती गुंतवणूक कराल? आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारतोय का हे ऐकून वडिलांना धक्काच बसला. यावर वडिलांची प्रतिक्रिया पाहून समोर बसलेला माणूस म्हणाला, काका, मी बजाज अलियान्झ या विमा कंपनीचा आहे.
So let me tell you my funny story- my mother would get on my fathers case to get me married,do something ,callsomeone look online etc. So one afternoon he got a call and he said yes yea come home. He announced to my mother that some man is coming with an alliance, mom got all 1/3
— harsha ramachandra (@taprichai) February 8, 2023
हर्षाच्या वडिलांनी अलायन्सला अलायन्स समजले होते. अशा परिस्थितीत जेव्हा विमा एजंट घरी आला तेव्हा मुलीच्या वडिलांनी त्याला आपल्या मुलीला भेटायला आलेल्या मुलाचा समज करुन घेतला. हर्षाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे.
दरम्यान, लग्ना करण्याच्या घाईगडबडीत अनेक चुका होतात. अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटनाही घडतात. सोशल मीडियावर तर असे अनेक किस्से समोर येत असतात.