मुंबई, 13 जुलै : मगर ही पाण्यातील फार धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील शिकारी प्राणी देखील तिच्यापासून लांब रहातात. पण विचार करा की जर डजनभर मगरी असतील आणि त्यांच्या तावडीत एक कोंबडा आला तर? कोंबड्याची आज शिकार झालीच असं तुम्ही म्हणाल. पण हा कोंबडा फार हुशार आहे. तो सर्व मगरींना पुरुन उरला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शोलेचा फेमस डायलॉग आठवेल, पण यावेळी मात्र शब्द थोडे वेगळे असतील… ‘कितने मगरमच्छ थें? एक कोंबडा आणि डजनभर मगरी ये तो ना इन्साफी है ….’ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कोंबडा आणि मगरींशी संबंधीत आहे. ज्यामध्ये एकटा कोंबडा डजनभर मगरींच्या तावडीतूनही सुखरुप वाचतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की जर तुम्ही भाग्यवान असाल तर या कोंबडीसारखे असावे. मगरींच्या कळपाला चकमा देऊन कोंबडा बाहेर आला व्हायरल होत असलेल्या या 10 सेकंदाच्या क्लिपमध्ये एक डजनच्या वर मगरी असल्याचे दिसतंय. तिथे चुकून एक कोंबडा आला. ज्यानंतर त्याला मारण्यासाठी तेथे काही मगरी पळू लागल्या. पण याचा काही फायदा झाला नाही, अखेर तो कोंबडा भिंतीवर उडीमारुन आपले प्राण वाचवतो. जणू त्याला अमर होण्याचे वरदान मिळाले आहे.
chicken escape pic.twitter.com/anT2AdNNI1
— Shibetoshi Nakamoto (@BillyM2k) July 9, 2023
@BillyM2k नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे - चिकन स्केप. या व्हिडीओला लाखोवेळा पाहिले गेले आहेत. लोकांनी या कोंबड्याच्या नशिबाचे अजब वाटले आहे, तर काहींना या कोंबड्याचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओवर कमेंट्सचा जोरदार पाऊस पडत आहे.