जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले तब्बल 16 Toothbrush; एक वाईट सवय सोडवण्यासाठी केला भयंकर उपाय!

बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले तब्बल 16 Toothbrush; एक वाईट सवय सोडवण्यासाठी केला भयंकर उपाय!

बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले तब्बल 16 Toothbrush; एक वाईट सवय सोडवण्यासाठी केला भयंकर उपाय!

मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलाच्या पालकांनी नको तो उपाय केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 26 ऑक्टोबर :  बहुतेकांना कोणती ना कोणती वाईट सवय (Bad habit) असते. आपल्यासाठी ही सवय चांगली नाही याची कल्पनाही त्यांना असते. मग त्या सवयीतून सुटका मिळवण्यासाठी बरेच उपाय केले जातात. एका 14 वर्षांच्या मुलानेदेखील आपली अशीच वाईट सवय सोडवण्यासाठी उपाय केला. पण त्याचा हा उपाय भयंकर होता. या मुलाने चक्क टूथब्रथ (Boy eating toothbruses) आणि लोखंडी खिळे गिळले. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे. हरीश देवी असं या मुलाचं नाव आहे. त्याला माती खाण्याची सवय आहे (Eating soil). लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. जसजसं वय वाढतं तशी ही सवय सुटते. पण या मुलाची मात्र ही सवय तशीच राहिली. 14 वर्षांचा झाला तरी तो माती खात होता. त्याच्या कुटुंबाने बरेच उपाय केले. शेवटी त्याची ही सवय सोडवण्यासाठी त्याचं कुटुंब त्याला एका मांंत्रिकाकडे घेऊन गेलं.  मांत्रिकाने या मुलाची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी टूथब्रथ आणि लोखंडी खिळे खाण्याचा सल्ला दिला. त्याने ते खायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाची तब्येत बिघडली. रिपोर्ट नुसार मुलाच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्य़ा. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे वाचा -  म्हणे, ‘जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत’, महिलेचा विचित्र सेव्हिंग फंडा डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्याच्या पोटात टूथब्रथ आणि खिळे दिसत होते.  डॉक्टरांनी तात्काळ त्याचं ऑपरेशन केलं. त्याच्या पोटातून तब्बल 16 टूथब्रश आणि 3 इंच लांब लोखंडी खिळे निघाले. ऑपरेशननंतर आता हळूहळू त्याची प्रकृती सुधारते आहे. काही दिवसांत तो पूर्णपणे ठिक होईल असं डॉक्टरांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात