मुंबई, 03 फेब्रुवारी : बदक (Duck video) म्हटलं की क्वॅक क्वॅक आवाज काढत पाहण्यात पोहोणारं किंवा जमिनीवर चालणारं इतकंच आपल्या डोळ्यासमोर येतं. अगदी भल्याभल्या प्राण्यांना पाण्यात चकवा देणाऱ्या बदकाचेही काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता अशा एका बदकाचा व्हिडीओ व्हायरल झाला जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. बदकाच्या छोट्याशा पिल्लाला हा व्हिडीओ आहे. इवल्याशा बदकाने इतकी मोठी कमाल केली आहे की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. बदकही असं काही करू शकतो, याचंच आश्चर्य वाटतं आहे. पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहून तोंडात बोटं घालाल. व्हिडीओत पाहू शकता एक बदक चक्क उभ्या भिंतीवर चालताना दिसतं आहे. हे इवलंसं बदक हळूहळू करत भिंतीवर चढतं आहे. पाहता पाहता ते पूर्ण भिंत चढतं. फिल्मध्ये तुम्ही स्पायडर मॅनला आणि प्रत्यक्षात कोळी, पाल किंवा एखादा सरपटणारा किटकाला असं भिंतीवर पाहिलं असेल. पण भिंतीवर चालतं आहे कोण तर चक्क बदक. असा बदक तुम्ही कधी पाहिलाच नसावा. हे वाचा - द ग्रेट बाबा! मारणं, ओरडणं नाही; 6 वर्षीय लेकासोबत थेट करार; वाचूनच अवाक व्हाल viralhog नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. द ग्रेट डकलिंग एस्केप असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलं आहे.
व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने आपल्या मुलीला गिफ्ट म्हणून हे बदकाचं पिल्लू आणलं होतं. या बदकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो घराजवळील भिंतीवर जाऊन चढू लागला. बदकाला असं भिंतीवर चढताना पाहून तोसुद्धा थक्क झाला. त्याने त्याचा व्हिडीओ बनवला. बदक पूर्ण भिंत चढेपर्यंत तो व्हिडीओ बनवत होता. जसं बदक भिंतीवर चढलं आणि उडी मारणार तोच त्या व्यक्तीने त्याला पकडलं. इतकी मेहनत केल्यानंतर यश मिळणार तोच बिच्चारा बदक पुन्हा मालकीच्या तावडीत गेला. हे वाचा - अरे बापरे! डान्स करणार तोच…; नवरा-नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL हा असं बदक पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. कुणी त्याला जेम्स बाँड म्हटलं आहे तर कुणी स्पायडर डक. तुम्हाला या बदकाला पाहून नेमकं काय वाटतं आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.