मुंबई, 03 फेब्रुवारी : लहान मुलं म्हटली की मजामस्ती आणि खोडकरपणा आलाच. लहान असली तरी ही मुलं नाकीनऊ आणतात. अशा मुलांना कंट्रोल करणं सोपं नसतं. पण पालक आपल्या मुलांना चांगलंच ओळखत असतात त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्याची पद्धतही त्यांना माहिती असते. प्रत्येक पालकांची मुलांना सांभाळण्याची त्यांना समजावण्याची, कंट्रोल करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही पालक आपल्या मुलांना ओरडतात, काही मारतात, काही प्रेमाच्या भाषेत समजवतात तर काही आणखी काही वेगळ्या पद्धतीने. पण सध्या एका वडिलांची आपल्या मुलाला कंट्रोल करण्याची अशी खतरनाक पद्धत अवलंबली आहे ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल (Smart Parenting Tips). मुलांनाही काहीही करायचं असेल तर ते आपल्या पद्धतीने करतात. पण पालकही मग स्मार्ट पद्धतीने विचार करून त्यांच्याशी डील करतात (Father son agreement). असाच स्मार्ट मार्ग या वडिलांनी शोधून काढला आहे, ज्याला दाद द्यायला हवी. त्यांनी आपल्या 6 वर्षांच्या मुलासाठी एक एग्रीमेंट म्हणजे करार तयार केला आहे (Agreement for 6 year old). या करारावर त्यांनी आपल्या मुलाचीही सहीसुद्धा घेतली आहे (6 year old signed agreement with dad) आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलानेही हसत हसत या करारावर सही केली आहे. कारण हा करारच तसा आहे. @Batla_G नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या कराराचा फोटो शेअर केला आहे. हे वाचा - जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई या करारात मुलासाठीचं दिवसभराचं शेड्युल आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलाने काय काय करायचं हे त्या त्या वेळेसोबत नमूद करण्यात आलं आहे. ज्यामध्ये खाणं-पिणं, खेळणं, अभ्यास, टीव्ही पाहणं याचा समावेश आहे. यामध्ये काही नियम, अटी ठेवल्या आहेत इतकंच नव्हे तर ते पूर्ण करण्याच्या बदल्यात त्यांनी त्याला ऑफरही दिल्या आहेत, जेणेकरून मुलगा त्या अटी, नियम मान्य करणार नाही असं होणारच नाही.
Me and my 6 year old signed and agreement today for his daily schedule and performance linked bonus 😂 pic.twitter.com/b4VBKTl8gh
— Batla_G (@Batla_G) February 1, 2022
जर हे रूटिन फॉलो केलं तर त्याला बक्षीस म्हणून पैसे दिले जातील. पण हे सर्व करण्यासोबतच न ओरडणं, न भांडणं आणि न रडणं यासाठी त्याल 10 रुपयांचा परफॉर्मन्स बोनस दिला जाईल. 7 दिवस हे सर्व करण्यात तो यशस्वी झाला, त्याला हे जमलं तर मग आठवड्याला त्याला 100 रुपयांचा बोनस मिळेल. हे वाचा - सातव्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आणि लगेच नोकरीवर गेली आई; संतापजनक आहे कारण हे अॅग्रिमेंट पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने आठवडाभरही मुलगा हे करू शकणार नाही असं म्हटलं आहे तर एका युझरने या टाइमटेबलमध्ये काही न करण्यासाठीही वेळ हवी होती, असं म्हटलं आहे.