जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरे बापरे! डान्स करणार तोच...; नवरा-नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

अरे बापरे! डान्स करणार तोच...; नवरा-नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

अरे बापरे! डान्स करणार तोच...; नवरा-नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

Shocking accident: नवरा-नवरीसोबत असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच धडकी भरली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 फेब्रुवारी: लग्नाचे बरेच व्हिडीओ (Wedding video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही भावुक असतात जे पाहून तुम्हाला हसू किंवा रडू येत. पण आता लग्नाचा एक असा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धडकी भरेल. नवरा-नवरीसोबत भयंकर दुर्घटना घडली आहे (Accident in Wedding video) . लग्न म्हटलं की धमालमस्ती, गाणं, डान्स आलंच. नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी, नातेवाईकच नाही तर अगदी नवरा-नवरीही डान्स करताना दिसतात. असाच डान्स करण्याच्या तयारीत नुकतंच लग्न झालेलं हे दाम्पत्य होतं. पण त्यांच्यासोबत त्यावेळी असं काही घडेल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. डान्स फ्लोअरवर हे कपल डान्स करण्यासाठी उभं होतं. तिथं उपस्थित सर्व लोक त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. काही लोक त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते. इतक्यात असं काही होतं की सर्वांचा काळजाचा ठोकाच चुकतो. नवरा-नवरी जान्स स्टेप्स करणार तो त्यांच्यावर धाडकन डीजेचा स्पीकर कोसळतो. हे वाचा -  या वयातही इतका जोश! म्हाताऱ्या आजीचं कृत्य पाहून तरुण नातू शॉक; VIDEO VIRAL व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी सुरुवातीला फोटो काढताना दिसतात. आता ते डान्स करणार तोच त्यांच्या मागे असलेला डीजेचा स्पीकरण पडतो तो थेट नवरदेवाच्या डोक्यावर. स्पीकरच्या धडकेने नवरदेव समोर ढकलला जातो तर नवरीबाई आपला जीव वाचवण्यासाठी उजव्या बाजूला पळते. तिथं उपस्थित इतर लोकही शॉक होतात.

जाहिरात

नवरदेव आपलं डोकं चोळताना दिसतो. त्याच्या डोक्याला आणि पाठीला कदाचित मार लागला असाव. पण सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. हे वाचा -  स्विमिंग पुलजवळ मस्ती पडली महागात; नवरीसह मैत्रिणीही पाण्यात कोसळल्या, VIDEO @be_harami इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहताच सुरुवातीला आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. पण दुसऱ्याच क्षणी आपल्याला हसूही आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून त्यावर मजेशीर कमेंटही येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात