अमरावती, 19 नोव्हेंबर : अमरावतीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. क्लच ऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने चक्क रेल्वे स्टेशनवरून कार रेल्वे रुळावर आदळल्याची घटना धामणगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला ही बाब तात्काळ लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी ही घटना घडली. रेल्वे स्टेशनला लागून कर्मचाऱ्यांची घरं आहे. एका घरासमोरून कार काढत असताना त्या कर्मचाऱ्याचा ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला. मग काय, कार अनियंत्रित झाली आणि पुलाचा कठडा तोडून कार थेट रेल्वेच्या रुळावर येऊन आदळली.
अमरावतीमधील घटना, कार थेट रेल्वे रुळावर येऊन आदळली pic.twitter.com/MqaKdVNRVW
— News18Lokmat (@News18lokmat) November 19, 2022
ही कार चक्क प्लॅटफॉर्मवरून हवेत उडी घेत रेल्वे रुळावर आदळली. सुदैवाने यावेळी मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा थरार अनेकांनी अनुभवला. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा थरारक प्रसंग अमरावतीकरांनी अनुभवला. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार बाजूला केली आहे. ( मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप; कारची अनेक गाड्यांना धडक, पादचाऱ्यांनाही उडवलं, VIDEO ) पुणे मिरज लोहमार्गावर रेल्वेची धडक बसल्याने एकाचा मृत्यू दरम्यान, पुरंदर तालुक्यातील पुणे मिरज मार्गावर पिसूर्टी येथे रेल्वे मार्गावर रेल्वेची घडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटली नसून मृत व्यक्तीने चौकड्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. ( रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे आणखी एक बळी; बीडमधील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत ) पुरंदर तालुक्यातील नीरा वाल्हे दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे शरीराचे अनेक तुकडे झाल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहे. या भागतील कोणाच्या घरातील व्यक्ती हरवली असल्यास जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.