मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप; कारची अनेक गाड्यांना धडक, पादचाऱ्यांनाही उडवलं, नाशकातील घटनेचा VIDEO

मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप; कारची अनेक गाड्यांना धडक, पादचाऱ्यांनाही उडवलं, नाशकातील घटनेचा VIDEO

मद्यधुंद चालकाचा थरार नाशकात पाहायला मिळाला. यात मद्यधुंद चालकाने वेगानं गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली. इतकंच नाही तर कारने काही पादचाऱ्यांनाही उडवलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 19 नोव्हेंबर : रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. देशात रस्ते अपघातामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या गंभीर आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी पाऊलं उचलली जात आहेत. मात्र, त्यानंतरही अपघात कमी होताना दिसत नाही. अशातच आता नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना धडक दिली.

दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं; 3 वाहनांना धडक देत.., बुलडाण्यातील विचित्र अपघात

मद्यधुंद चालकाचा थरार नाशकात पाहायला मिळाला. यात मद्यधुंद चालकाने वेगानं गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना धडक दिली. इतकंच नाही तर कारने काही पादचाऱ्यांनाही उडवलं. या धडकेत 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मद्यधुंद कार चालक हा शिक्षक असल्याचं समोर आलं आहे. या शिक्षकाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पोलीस ही कार थांबण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, हा मद्यधुंद चालक थांबायला तयार होत नाही. पोलीस पाठलाग करत असतानाही तो आपली कार वेगात चालवताना दिसतो. व्हिडिओमध्ये कारचंही पुढच्या बाजूने बरंच नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळतं.

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

बुलडाण्यातही विचित्र अपघात -

बुलडाण्यातूनही नुकतीच एक अशीच घटना समोर आली होती. यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिली. हा पोलीस कर्मचारी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलेलं नाही.

First published:

Tags: Nashik, Road accident