Home /News /viral /

OMG! हवेत उडत थेट झाडावर लँड झाली कार; अंगावर काटा आणणारा Video

OMG! हवेत उडत थेट झाडावर लँड झाली कार; अंगावर काटा आणणारा Video

फिल्मप्रमाणे प्रत्यक्षातही एक कार हवेत उडताना दिसली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 27 जून : काही हॉलिवूड फिल्ममध्ये तुम्ही हवेत उडणारी कार पाहिली असेल. प्रत्यक्षातही अशा एका कारचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर फ्लाइंग कार म्हणून एका कारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या कारची चर्चा होते आहे. ही कार हवेत उडत थेट झाडावर लँड झाली आहे. व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. हवेत उडणाऱ्या कारचं हे धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे (Flying car video). व्हिडीओत पाहू शकता रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरं आणि झाडं दिसत आहेत. कॅमेऱ्याच्या समोर एक सुकलेलं झाड आहे. ज्यावर पानं नाहीत. अचानक एक कार वेगाने हवेत उडत येताना दिसते. ही कार थेट त्या झाडावर कोसळते (Car crash into tree video). हवेत उडत येणारी कार झाडाला धडकून जमिनीवर कोसळते. दुर्घटनेनंतर झाडही मोडतं आणि रस्त्यावर येऊन कोसळतं. व्हिडओत पाहिल्यानंतर ही कार फ्लाइंग कारसारखी वाटते. म्हणजे ती हवेत उडणारी कार आहे, असं वाटतं. पण व्हिडीओ नीट पाहिला तर खरंतर ही कार जमिनीवर आधी कशाला तरी धडकून हवेत उडाल्यासारखं दिसतं आणि ती हवेत उडते. हा अपघात नेमका कसा झाला ते माहिती नाही, पण त्याचा भयंकर परिणाम मात्र दिसतो आहे. कारचं फार नुकसान झाल्याचं दिसत नाही पण घटनेची तीव्रता पाहता ड्रायव्हरची काय अवस्था झाली असेल याचा अंदाजा नक्कीच लावता येतो. जिथं ही घटना घडली तिथं सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता त्यामुळे ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली (Road accident CCTV video) आणि हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. @clownabsolute1 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्या आळा आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.  त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने हा एवेंजर्समधील सीन वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर एका युझरने ही व्यक्ती टाइम ट्रॅव्हलच्या माध्यमातून भूतकाळात आली आणि पुन्हा भविष्यात जाण्याचे त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले असं म्हटलं आहे. तर आणखी एका युझरने नक्कीच हा ड्रायव्हर आपली कार हवेत उडत असावी हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल अशी मजेशीर कमेंटही केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Car, Car crash, Viral, Viral videos

    पुढील बातम्या