समुद्र किनाऱ्यावर खेळत होता चिमुरडा, मागून आला शिकारी शार्क आणि...; पाहा भयंकर VIDEO

चिमुरड्याच्या मागून आला शार्क आणि पुढे जे काय झालं ते पाहून धडकी भरेल.

चिमुरड्याच्या मागून आला शार्क आणि पुढे जे काय झालं ते पाहून धडकी भरेल.

  • Share this:
    फ्लोरिडा, 22 जुलै : अमेरिकेतील फ्लोरिडा शहर हे समुद्र किनारपट्टीसाठी ओळखले जातात. मात्र येथे मोठ्या प्रमाणात शार्क मासेही आहे. येथील कोको बीचचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भयंकर घटना घडली. एक लहान मुलगा पाण्यात खेळत असताना अचानक त्याच्या मागून शार्क मासा आहे. सुदैवाने या मुलाला वाचवण्यात एका पोलीस अधिकाऱ्याला यश आले. ही घटना एखाद्या सिनेमाप्रमाणे घडली. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पोलीस अधिकारी अॅसड्रियन कोसिकी आपल्या पत्नीसमवेत समुद्र किनाऱ्यावर फिरत होते, जेव्हा त्यांना पाहिले की पाण्यामध्ये काहीतरी हालचाल होत आहे. त्यांना तेवढ्याच एक शिकारी शार्क दिसला. हा शार्क किनाऱ्यावर खेळत असलेल्या मुलाच्या दिशेने येत होते, तेवढच्या पोलीस अधिकाऱ्याने पाण्यात उडी मारून या मुलाचे प्राण वाचवले. हा व्हिडीओ कोको बीच पोलीस आणि फायर विभागाने फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी अॅ्ड्रियन पाण्यात उडी मारताना स्पष्टपणे दिसत आहेत. वाचा-VIDEO: बाइक घेऊन जात असतानाच कोसळली दरड, डोळ्यांसमोर होता मृत्यू पण... वाचा-24 तासांची शिफ्ट करून अशी झाली कोव्हिड योद्धाच्या चेहऱ्याची अवस्था या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडा पोलीस अधिकाऱ्याचा आवाजही ऐकू येत आहे. ते म्हणत आहे की, त्या बाजूला एक शार्क आहे...त्यानंतर अॅाड्रियन पाण्यात उडी मारतात आणि मुलांला खेचून किनाऱ्यावर आणतात. वाचा-हायवेवर गाडी चालवत असताना अचानक समोर आलं हरिण, हद्याचे ठोके वाढवणारा VIDEO फॉक्स न्यूजच्या म्हणण्यानुसार पाण्यात शार्क होता की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या पोलीस अधिकाऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी, " अॅतड्रियनचे खूप खूप आभार, शार्कचा हेतू काय होता हे आम्हाला कधीच कळणार नाही, परंतु या लहान मुलाला एक कहाणी मिळाली". हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published: