चियांगजूर, 21 जुलै : सारं जग सध्या कोरोनासारख्या अदृश्य विषाणूशी दोनहात करत असताना दुसरीकडे भूकंप, पूर, भुस्खलन यांसारख्या आपत्तीही येत आहे. मुसळधार पावसामुळे देशातील काही भागांत दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच एक इंडोनेशियाचा व्हिडीओ समोर आला आहे. हैराण करणारा हा व्हिडीओ एप्रिलमधला असल्याचे बोलले जात आहे, मात्र सध्या हा व्हिडीओ भारतात मेघालयमधील भुस्खलन या नावाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर बाईक चालवत असताना अचानक दऱड कोसळताना दिसत आहे. मात्र या बाईक चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले. मेट्रो टीव्हीच्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात इंडोनेशियातील चियांगजूर आणि सुकानागाराच्या वस्तीजवळ भूस्खलन झाले. व्हिडीओमध्ये हे दिसत आहे की दरड कोसळतानाच एक व्यक्ती बाईक घेऊन येतो, जीव वाचवण्यासाठी टर्न मारतो. टर्न मारताना त्याची गाडी खाली पडते, आणि चिखलाखाली दबली जाते. मात्र या व्यक्तीला वाचवण्यात लोकांना यश आले आहे.
Omg!!!! What a narrow escape for that biker pic.twitter.com/W9eX0kBZzd
— Nandini Idnani 🚩🇮🇳 (@nandiniidnani69) July 19, 2020
रविवारी ट्विटरवर हा व्हिडीओ नंदिनी इडानी या युझरने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ 30 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
काही लोकांनी ही घटना मेघालयात घडली असा दावा केला जात होता, त्यानंतर मेघालय पोलिसांनी ही घटना इंडोनेशिया घडली असल्याचे सांगितले. संपादन - प्रियांका गावडे