जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताच महिला शॉक; रात्रीच्या प्रवासात काय दिसलं पाहा VIDEO

विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताच महिला शॉक; रात्रीच्या प्रवासात काय दिसलं पाहा VIDEO

विमानाबाहेर दिसलं अद्भुत दृश्य

विमानाबाहेर दिसलं अद्भुत दृश्य

एका विमान प्रवाश्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात विमानाच्या खिडकीतून दिसलेलं अद्भुत दृश्य कैद केलं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मे : विमानातून प्रवास करायला कुणाला आवडणार नाही. बहुतेक श्रीमंत लोकांसाठी विमान प्रवास तर सामान्य झाला आहे. पण सामान्य लोक ज्यांना किमान एकदा तरी आपण विमानातून प्रवास करावा अशी इच्छा असते. उंच आकाशात उडणाऱ्या विमानातून काय काय आणि कसं दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. अशाच एका दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही विमानातून प्रवास केला असेल तर तुम्हाला अद्भुत दृश्य नक्कीच दिसली असतील. छोट्या छोट्या बिल्डिंग्स, विशाल समुद्र, कापसासारखे ढग असं तुम्ही काय काय नाही पाहिलं असेल. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात विमानातून दिसलेलं दृश्य हे अतिशय दुर्मिळ आहे. या विमानातील प्रवाशांना हे दृश्य पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी इतरांनाही हे दृश्य दाखवलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानाचा पायलट काहीतरी सांगतो आहे. त्याचं बोलणं महिला नीट ऐकते आणि ती शॉक असते. पायलटने असं काही सांगितलं की तिला सुखद धक्का बसला आहे. तिला विश्वासच बसत नव्हता. विमानाच्या बाहेर एक अद्भुत दृश्य दिसणार असल्याचं पायलट सांगतो आणि महिलेला राहवत नाही. ती आपल्या मोबाईलमध्ये ती आपण किती उंचावर आहोत हे तपासते. त्यानंतर उभं राहून खिडकीच्या दिशेने आपला मोबाईल धरते. मोबाईलमध्ये ती खिडकीच्या बाहेरचं दृश्य कैद करते. तिच्या मोबाईलमध्ये काय कैद झालं ते तुम्हीच पाहा. विमान प्रवासातील सर्वात घाणेरड्या गोष्टी; एअर हॉस्टेसनेच उलगडले प्लेनमधील डर्टी सिक्रेट्स व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानाच्या बाहेर काळोख आहे. यावरून हा प्रवास रात्रीचा असावा. या अंधारात एक हिरव्या रंगाची लाइट चमकताना दिसते. किंबहुना हिरव्या रंगाचा धूर, लाटा दिसतात. आता हे काय आहे, तर हे नॉर्दन लाइट्स आहेत. नॉर्दर्न लाइट्स ही एक वातावरणीय घटना आहे. ज्यामध्ये आकाशात हिरव्या, लाल आणि जांभळ्या रंगाच्या प्रकाश लाटा दिसतात. त्याला AuroraBorealis असंही म्हणतात. जेव्हा सूर्यापासून (सौर वारा) सक्रिय कणांच्या लाटा वातावरणावर प्रकाश टाकतात तेव्हा ही घटना घडते. त्यानंतर आकाशात फिरणारे कण चुंबकीय क्षेत्रासह ग्रहाच्या ध्रुवाभोवती फिरतात, कणांमधून ऊर्जा आणि प्रकाशाच्या संयोगाने आकाशात रंगीबेरंगी आणि चमचमणारा प्रकाश निर्माण होतो. विमानात पाणी मागणारे प्रवासी एअर हॉस्टेसना बिलकुल आवडत नाहीत; करतात राग राग कारण… @rclbeauty101 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

तुम्ही विमान प्रवासात असं दृश्य पाहिलं होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात