मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

VIDEO - व्वा गं झाशीची राणी! वार झेलले तरी मोबाइल चोरांना सोडलं नाही; 15 वर्षांच्या मुलीची कामगिरी

VIDEO - व्वा गं झाशीची राणी! वार झेलले तरी मोबाइल चोरांना सोडलं नाही; 15 वर्षांच्या मुलीची कामगिरी

बाईकस्वार मोबाईल चोरांना 15 वर्षांच्या मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

बाईकस्वार मोबाईल चोरांना 15 वर्षांच्या मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

बाईकस्वार मोबाईल चोरांना 15 वर्षांच्या मुलीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

  • Published by:  Priya Lad
चंदीगड, 01 सप्टेंबर : वय फक्त 15 वर्षे... मात्र झाशीच्या राणीप्रमाणे ती मोबाईल चोरट्यांशी लढली. चोरट्यांनी तिच्यावर वार केले हे वार तिने झेलले मात्र हार मानली नाही. चोरट्यांचा पाठलाग काही तिने सोडला नाही. या चोरट्यांना तिने चांगलीच अद्दल घडवली आहे. पंजाबच्या जालंधरमधील या झाशीच्या राणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार कुसुम कुमारी असं या मुलीचं नाव आहे. फतेहपुरी मोहल्लामध्ये ती राहते.  कुसुम आपल्या घरी जात होती. त्यावेळी दोन व्यक्तींनी बाईकवर बसून तिचा पाठलाग केला. चालकाच्या मागे बसलेल्या व्यक्तीने तिच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. त्याच क्षणी कुसुमने त्यांची बाईक मागून धरून ठेवली. काही अंतरापर्यंत बाईकस्वारांनी तिला फरफटतही नेलं. मात्र कुसुमने काही त्यांची बाईक सोडली नाही. अखेर ज्या चोराने तिचा मोबाइल हिसकावला होता तो बाईकवरून खाली उतरला आणि कुसुमशी हुज्जत घालू लागला. त्याने कुसुमला मारहाण केली. तिचे केस धरले. तिच्यावर धारदार शस्त्राने वारही केले. मात्र कुसुम घाबरली नाही की मागे हटली नाही. कुसुमला मारून हा चोर पुन्हा बाईकवर बसायला गेला तेव्हा कुसुमने पुन्हा त्याचा पाठलाग केला. त्याने पुन्हा कुसुमला मारलं. तेव्हा तिथले काही लोक तिच्या मदतीसाठी धावून आले. हे वाचा - एक नंबर! साडीवरच महिलेने मारला FLIP ; स्टंटच्या VIDEO ने सोशल मीडियावर आग लावली लोकांना येताना पाहताच दुसऱ्या चोराने बाईकवरून धूम ठोकली आणि कुसुमला मारणारा चोर लोकांच्या तावडीत सापडला. कुसुमला आपला मोबाइलही परत मिळाला आणि तिच्या या हिमतीमुळे चोराला अटक झाली आहे. अविनाश कुमार असं या चोराचं नाव आहे. चोरांशी लढताना कुसुमला गंभीर दुखापत झाली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कुसुमने दाखवलेल्या या हिमतीचं सर्व जण कौतुक करत आहेत.
First published:

Tags: Viral videos

पुढील बातम्या