मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Flight Accident : धक्कादायक! विमान प्रवासात 121 जणांचा मृत्यू, काय घडलं होत 18 वर्षांपूर्वी

Flight Accident : धक्कादायक! विमान प्रवासात 121 जणांचा मृत्यू, काय घडलं होत 18 वर्षांपूर्वी

विमानातील 'त्या' एका बटणामुळे पायलटसह 121 जणांनी गमावला होता जीव, वाचा अंगावर शहारे आणणारी 18 वर्षांपूर्वीची दुर्घटना

विमानातील 'त्या' एका बटणामुळे पायलटसह 121 जणांनी गमावला होता जीव, वाचा अंगावर शहारे आणणारी 18 वर्षांपूर्वीची दुर्घटना

एक विमान दुर्घटना 18 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये घडली होती. या दुर्घटनेत 121 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 17  जानेवारी : दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये विमान दुर्घटना झाली. काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण करणारे यती एअरलाइन्सचे एटीआर 72 विमान रविवारी सकाळी शहरातील नायगाव इथं कोसळलं. या घटनेत विमानातील सर्व 70 प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर लोकांना जगभरातील काही विमान अपघातांची आठवण झाली. अशीच एक विमान दुर्घटना 18 वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये घडली होती. या दुर्घटनेत 121 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली होती. ती म्हणजे या अपघाताला फक्त एक बटण कारणीभूत ठरलं होतं. एका बटणामुळे तब्बल 121 जणांना जीव गमवावा लागला होता. त्या दिवशी विमानात नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

14 ऑगस्ट 2005 रोजी सकाळी हेलिओस फ्लाइट सायप्रसच्या लार्नाका इथून चेक रिपब्लिक इथल्या प्रागला जाणार होती. ग्रीसमधील अॅथेन्स इथं तिचा स्टॉपओव्हर होता. सकाळी नऊच्या सुमारास या विमानाने उड्डाण केलं, त्यावेळी त्यात 115 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.

हे विमान 58 वर्षीय जर्मन पायलट हॅन्स जर्गेन मर्टेन चालवत होते. त्यांना 16 हजार 900 फ्लाइंग तासांचा अनुभव होता. त्यांच्याबरोबर को-पायलट 51 वर्षीय पॅम्पोस चारांलांबस होते व त्यांना 7 हजार 549 तासांचा फ्लाइंग अनुभव होता. तसेच अँड्रियास प्रोड्रोमॉउ फ्लाइट अटेंडंट म्हणून कमांड सांभाळत होते.

हे ही वाचा : सुशांतच्या मृत्यूच्या 3 वर्षानंतर कुटुंबावर पुन्हा कोसळलं दुःखाचं डोंगर; अभिनेत्याच्या लाडक्या फजचं निधन

डेली मेलच्या वृत्तानुसार, उड्डाणानंतर 12 मिनिटांनी म्हणजे 9 वाजून 12 मिनटांनी विमान 12 हजार 40 फूट उंचावर पोहोचलं आणि अचानक एक अलार्म वाजला. त्याची तपासणी केली असता तो टेक-ऑफ कॉन्फिग्रेशन वॉर्निंग अलार्म होता. तो पाहताच दोन्ही पायलट विचारात पडले, कारण तो अलार्म प्लेन जमिनीवर असताना वाजतो. त्यामुळे 12 हजार फूट उंचावर असताना तो कसा वाजला, हे पायलटला कळलंच नाही.

परिस्थितीचं गांभीर्य बघता दोन्ही पायलटनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्याचवेळी कॉकपिट पॅनलमधील अनेक अलार्म एकाचवेळी वाजू लागले. त्यामुळे पायलटचा आवाज एटीसीपर्यंत पोहोचला नाही. नंतर प्लेनचा मास्टर कॉशन अलार्म वाजू लागला. विमानातील खूप साऱ्या सिस्टम्स ओव्हरहीट झाल्याचे ते संकेत होते. पायलट्सच्या लक्षात येत नव्हतं की नक्की काय घडतंय.

प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास

विमानातील प्रवाशांना याबद्दल कळताच गोंधळ उडाला. क्रू मेंबर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. अशातच प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अचानक ऑक्सिजन मास्क आपोआप खाली आले. हे घडत असताना विमान 18 हजार फूट उंचीवर होतं. पायलट एटीएसला प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण आवाजामुळे त्यात अडथळा येत होता. अशातच एटीएसशी संपर्क तुटला.

विमान सतत वरच्या दिशेने जात होतं. सहसा फ्लाइट वर जायला 1 तास 45 मिनिटं लागतात. विमान सकाळी 10.45 वाजता अॅथेन्स एअरपोर्टवर उतरणार होते. 9:23 वाजता विमान 34,000 फूट उंचीवर होतं. यानंतर, सकाळी 9.37 वाजता हे विमान अॅथेन्सच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये पोहोचलं. 10:12 ते 10:50 पर्यंत, अॅथेन्स एटीसी टीमने रेडिओ कंट्रोलद्वारे पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. 10:45 वाजले होते, पण विमान अजून उतरलं नव्हतं.

हे ही वाचा : Rakhi Sawant Controversy: सलमान खानमुळे वाचलं राखीचं लग्न; आदिल-भाईजानच्या 'त्या' फोनकॉलमध्ये असं काय घडलं? 

दोन फाइटर जेट्स आली मदतीला

विमानाबद्दल संशय आल्याने ग्रीक अधिकाऱ्यांनी विमान शोधण्यासाठी त्यांची दोन सर्वोत्तम F-16 लढाऊ विमाने पाठवली. काही वेळातच या लढाऊ विमानांना हेलिओस फ्लाइट सापडलं. यापैकी एक लढाऊ विमान या विमानाच्या अगदी जवळ आलं आणि आत काय चाललंय ते पाहिलं. पण त्यांना पायलट सीटवर कोणीच दिसलं नाही. मुख्य पायलट त्याच्या सीटवर बेशुद्ध पडला होता. त्यानंतर हे लढाऊ विमान मागे गेलं आणि तिथून विमानातील परिस्थितीचा आढावा घेतला. पण फायटर जेटच्या पायलटसाठी आश्चर्याची गोष्ट ही होती की एकाही प्रवाशाने तिकडे वळून पाहिलं नाही. त्याला कोणत्याही प्रवाशाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

लेफ्ट साइडच्या इंजिनने काम करणं बंद केलं

अशातच जवळपास 11 वाजून 49 मिनटांनी फायटर जेटच्या पायलटने पाहिलं की एक व्यक्ती केबिनमधून कॉकपिटकडे जातेय. नंतर काही वेळात तो पायलट सीटवर बसताना दिसला. तिला पाहून फायटर जेटच्या पायलटने इशारा करत काय घडलंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्तीही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण, ती काहीच बोलू शकली नाही. हे सुरू असताना विमानाच्या डाव्या इंजिनने काम करणं बंद केलं आणि विमान डाव्या बाजूला खाली झुकत वेगाने खाली जाऊ लागलं.

विमान डोंगरांजवळ जाऊन कोसळलं

पायलट सीटवर बसलेला माणूस विमान कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला अपयश आलं. त्यानंतर 12 वाजता फ्लाइटच्या उजव्या इंजिननेही काम करणं बंद केलं. विमान नियंत्रणाबाहेर गेलं होतं. मग 12 वाजून 4 मिनटांनी ते विमान अॅथेन्सपासून 40 किलोमीटर दूर ग्रॅमॅटिका इथल्या डोंगरांमध्ये जाऊन कोसळलं. या घटनेत विमानातील सर्व प्रवासी, पायलट्स व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

विमानातील सात जणांचा आधीच मृत्यू झाला होता

फाइटर जेटचा पायलटला आपल्या डोळ्यांसमोर प्रवाशांनी भरलेलं विमान क्रॅश होताना पाहून धक्का बसला. त्यानंतर हे विमान कोसळल्याची घटना संपूर्ण ग्रीसमध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. सर्व 121 मृतदेहांचा शोध घेऊन त्यांना तिथून बाहेर काढलं. त्यापैकी काही मृतदेहांच्या पोस्ट मॉर्टेमनंतर धक्कादायक बाब समोर आली. विमानातील पायलटसह जवळपास सर्वच लोकांचा मृत्यू विमान क्रॅश होण्याआधीच झाला होता. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला. तो असा की जर दोन्ही पायलटचा मृत्यू विमान क्रॅश होण्याच्या दोन तासांआधी झाला होता, तर मग त्या विमानाचं कंट्रोल कोणाजवळ होतं.

विमान कोणी कंट्रोल केलं?

तपासात असं आढळून आले की, पायटलच्या मृत्यूनंतर फ्लाइट अटेंडंट अँड्रियास प्रोड्रोमो हे विमान सांभाळत होता. कारण सर्वात शेवटी एटीसीने अँड्रियासचा आवाज ऐकला होता. त्यांनी मेडे मेडे म्हणत जवळपास पाच मिनिटं मदत मागितली होती. अँड्रियासकडे यूकेचा कमर्शिअल पायलटचं लायसन्स होतं. पण बोईंग 737 सारखे विमान कंट्रोल करण्याचा पुरेसा अनुभव त्याच्याकडे नव्हता. असं असूनही, तो विमान दाट लोकवस्तीपासून दूर नेण्यात यशस्वी झाला. जर हे विमान लोकवस्ती असलेल्या परिसरात कोसळलं असतं, याची कल्पना करणंही अशक्य आहे.

तपास अधिकाऱ्याने पकडली चूक

या घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांनी तपास सुरू केला. विमान डाव्या बाजूला का झुकले होते, या संदर्भात तपास केला असता विमानाच्या डाव्या बाजूचे इंधन संपल्याचं आढळून आलं. मात्र ते या अपघाताच्या मूळ कारणापर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्यानंतर तपास अधिकाऱ्याची नजर कंट्रोल पॅनलवरील एका बटणावर पडली. हे बटण विमानाचे प्रेशर सेट करण्यासाठी होते. हे बटण पाहून तपास

अधिकाऱ्यांना हा अपघात कसा झाला, हे लक्षात आलं.

हे प्रेशराइज बटण संपूर्ण विमानात हवेचं प्रेशर कंट्रोल करते. याच्याच मदतीने बाहेरील इंजिन बाहेरची हवा थोडी थोडी आत पाठवतात. आत बसलेल्या लोकांना ऑक्सिजन मिळत राहावा, यासाठी ते केलं जातं. खरं तर हे बटण नेहमी ऑटोमॅटिक मोडवरच ठेवलं जातं. जर कधी हे बटण मॅन्युअल मोडवर चेंज केलं असेल तर पायलट आणि को पायलटला त्यावर लक्ष ठेवावं लागतं.

पायलटची नेमकी चूक काय झाली होती

विमान अपघाताचा तपास जसजसा वाढला, तसतशा या अपघातातील अनेक बाबी उघडकीस आल्या. अपघाताचं मुख्य कारणंही तपासामध्ये समोर झालं. जेव्हा हे विमान रुटीन सर्व्हिससाठी पाठवण्यात आलं होतं, तेव्हा तिथल्या सर्व्हिस करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या प्रेशराइज बटणाला मॅन्युअल मोडवर टाकलं. विमान परत आलं आणि प्रवाशांना घेऊन उड्डाण केलं. पण विमान उडवत असताना दोन्ही पायलट्सचं लक्ष या बटणाकडे गेलंच नाही. बटण ऑटोमॅटिक मोडवर नसून मॅन्युअल मोडवर आहे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. यामुळे विमानात ऑक्सिजन कमी होऊ लागलं. हळूहळू ऑक्सिजन कमी होऊ लागला आणि विमानातील प्रवाशांचा जीव गुदमरू लागला. ते श्वास घेऊ शकत नव्हते. पायलट्सनी यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या बटणाकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. त्यानंतर कॉकपिटमध्येही ऑक्सिजन लेव्हल कमी झाली, परिणामी दोन्ही पायलट्स बेशुद्ध झाले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स हळूहळू बेशुद्ध होऊ लागले. ऑक्सिजन न मिळाल्याने या सर्वांचा एकेक करून मृत्यू झाला.

फ्लाइट अटेंडेंटने विमान कंट्रोल करण्याचा केला प्रयत्न

इतकं सगळं घडल्यानंतरही विमान ऑटो पायलट मोडवरच अॅथेन्सच्या दिशेने निघालं. पण या विमानात एक व्यक्ती अजूनही जिवंत होती. तो फ्लाइट अटेंडंट अँड्रियास प्रोड्रोमो होता. अँड्रियास एक स्कूबा डायव्हरदेखील होता. त्यामुळेच त्याला बराच वेळ श्वास रोखून धरण्याचा अनुभव होता. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याची प्रकृतीही काही काळानंतर खालावू लागली. तरीही त्याने कसंतरी विमानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्याला यात यश मिळू शकलं नाही आणि अखेर विमान पर्वतांमध्ये जाऊन कोसळले.

अंतिम रिपोर्टमध्ये अधिकाऱ्यांनी काय म्हटलं होतं

या घटनेच्या 15 महिन्यांनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी घटनेचा रिपोर्ट सादर केला. ज्यामध्ये या घटनेला फक्त एक बटण जबाबदार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ते विमानाचं प्रेशर बटन होतं. तो ऑटो मोडमध्ये राहिलं असतं तर कदाचित अपघात झाला नसता आणि 121 जणांचा जीव वाचला असता.

First published:

Tags: Domestic flight, Travel by flight