मुंबई, 17 जानेवारी- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्या लग्नाचा ड्रामा सुरु होता. राखी सावंतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपलं लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. तर आदिल खान दुर्रानीने यावर मौन बाळगलं होतं. तसेच राखी सावंतने अनेक व्हिडीओ शेअर केले होते. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना आणि आदिल आपला स्वीकार करत नसल्याचं सांगताना दिसून आली होती. परंतु आता आदिल खान दुर्रानीने स्वतः लग्नाचा स्वीकार करत राखीला शुभेच्छा देत फोटो शेअर केला आहे. मात्र यापाठीमागे सलमान खान चं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. ते कसं आपण पाहूया. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आपण आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचं सांगत आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये आदिल आणि राखीने कोर्ट मॅरिज केल्याचं दिसून आलं होतं. परंतु हे फोटो शेअर करत राखीने काही गंभीर खुलासे केले होते. यामध्ये अभिनेत्रीने म्हटलं होतं की, आपण ७ महिन्यांपूर्वी आदिलसोबत लग्न केलं आहे. परंतु आता तो हे लग्न स्वीकार करत नाहीय. त्याने माझ्याशी लग्न केलेलं असूनदेखील दुसऱ्या मुलीशी नातं ठेवलं असल्याचं राखीने म्हटलं होतं त्यामुळे एकच खळबळ माजली होती. (हे वाचा: Rakhi Sawant: ‘माझ्या आईला समजल्यावर तिचं काय..’, अन भररस्त्यात ढसाढसा रडू लागली राखी **)** दरम्यान आता आदिल खान दुर्रानीने समोर येत आपलं आणि राखीचं लग्न झालं असल्याची कबुली दिली आहे. आदिल खानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपला आणि राखीच्या लग्नाचा फोटो शेअर करत आपलं लग्न झाल्याचं अधिकृतपणे उघड केलं आहे. त्यामुळे राखी आणि आदिलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदिलने फोटो शेअर करत लिहलंय, ‘मी आता जाहीर करतो की, आम्ही लग्न केलंय. मी कधीच लग्न केल्याच्या गोष्टीला नकार दिलेला नाहीय राखी. फक्त काही गोष्टी होत्या ज्या सांभाळायच्या होत्या. त्यामुळे मी शांत होतो. आपल्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा राखी’. असं म्हणत आदिलने कबुली दिली आहे.
तर आता इन्स्टंट बॉलिवूडसोबत बोलताना नवा खुलासा झाला आहे. यावेळी राखीने सांगितलं की, सलमान खान यांच्यामुळे माझं घर वाचलं. त्यांच्यामुळे आदिल नीट मार्गावर आला आहे. सलमान खान यांचा आदिलला फोन आला असल्याचं राखीने सांगितलं. सलमान खानने नेमकं फोनवर काय सांगितलं याबाबत विचारलं असता, ‘आदिलने म्हटलं की, सलमान सरांनी मला सांगितलं लग्न झालं असेल तर ते मान्य कर आणि नसेल तर तसा स्पष्टपणे सांग. परंतु जे आहे त्याला सामोरं जा’. त्यांनतर आदिलने आपल्या लगेच स्वीकार करत लग्नाची कबुली दिली आहे. सर्वांचं माहिती आहे राखी सावंत सलमान खानला भाऊ मानते. आणि सलमान खाननेही अनेक कठीण प्रसंगात राखीची मदत केली आहे.
राखीने स्वीकारला ईस्लाम - राखी सावंतने लग्न करत आपण इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीने आपण आपलं नाव बदलून फातिमा केल्याचंसुद्धा म्हटलं आहे. सध्या राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.