मराठी बातम्या /बातम्या /Viral /एक दोस्ती अशीही! मृतावस्थेत पडलेल्या पक्ष्याला जागं करताना मित्राची धडपड, मन हेलावून टाकणारा VIDEO

एक दोस्ती अशीही! मृतावस्थेत पडलेल्या पक्ष्याला जागं करताना मित्राची धडपड, मन हेलावून टाकणारा VIDEO

एक गालाह पक्षी रस्त्यावर मृत अवस्थेत पडला असून, दुसरा पक्षी तेथे येतो आणि ते पाहून अस्वस्थ होतो.

एक गालाह पक्षी रस्त्यावर मृत अवस्थेत पडला असून, दुसरा पक्षी तेथे येतो आणि ते पाहून अस्वस्थ होतो.

एक गालाह पक्षी रस्त्यावर मृत अवस्थेत पडला असून, दुसरा पक्षी तेथे येतो आणि ते पाहून अस्वस्थ होतो.

    मुंबई, 6 जुलै- माणूस जसा बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो तसं प्राणी करू शकत नाहीत. कारण त्यांना बोलताच येत नाही. शब्दांची भाषा न येणारे हे मुके जीव प्रेम, निष्ठा आणि संवेदनशीलता याबाबत मात्र माणसापेक्षा दोन पावलं पुढंच असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचे अनेक किस्सेही आपण ऐकत आलो आहोत. माणूस जितकं प्रेम प्राण्यांवर करतो त्याच्या कितीतरी अधिक पट प्रेम प्राणी मालकावर करतात. आपल्या मालकाच्या विरहात आपले प्राण त्यागणाऱ्या, आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱ्या प्राण्यांच्या सत्यकथा आपण अनेकदा ऐकत असतो. अशाच एका मुक्या जीवाच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय वनसेवेतील (IFS) अधिकारी सुशांत नंदा (Sushant Nanda) यांनी आपल्या (@ सुसंतानंद3) ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे.

    या व्हिडिओमध्ये आपल्या सहकारी पक्ष्याच्या मृत्यूनं दुःखी झालेला एक पक्षी (Bird) त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचा जोडीदार या जगात नाही यावर त्याचा जणू विश्वासच बसत नाही आहे, असं त्याची ती कृती बघून वाटतं. या पक्ष्यांचं आपापसातलं प्रेम, विरहानं व्याकुळ झालेल्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप मन हेलावून टाकतं. हा ऑस्ट्रेलियन गालाह (Australian Galah) नावाचा पक्षी आहे. पिंक आणि ग्रे कॉकॅटोदेखील (Cokatoo) म्हटले जाते, अशी माहिती नंदा यांनी याच्या कॅप्शन मध्ये दिली आहे.

    (हे वाचा:उंदरांनाही लागली दारूची चटक? दुकानातील 12 बाटल्या केल्या रिकाम्या अन्...  )

    एक गालाह पक्षी रस्त्यावर मृत अवस्थेत पडला असून, दुसरा पक्षी तेथे येतो आणि ते पाहून अस्वस्थ होतो. तो वारंवार आपल्या मित्राकडे जातो आणि त्याला आपल्या चोचीने वर नेण्याचा प्रयत्न करतो. कधी या बाजुने तर कधी त्या बाजूने, तो त्याला हलवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. अनेक प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा त्याचा मित्र उठत नाही, तेव्हा त्याची खात्री पटते की तो जिवंत नाही. नंतर अनेक पक्षी तिथं जमलेले दिसतात. आपल्या मित्राला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले दिसत असून, जणू माणसांप्रमाणे तेही शोकसभा घेत आहेत, असं हे दृश्य बघून वाटतं.  सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, जोडीदाराच्या मृत्यूनं दु: खी झालेला हा पक्षी आहे. आपल्या मित्राला, सहकाऱ्याला शेवटचा निरोप देण्याची त्यांची ही तगमग अनेकांना हेलावून टाकणारी आहे.

    आतापर्यत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हा व्हिडिओ मन व्याकूळ करणारा असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Video viral