Home /News /viral /

VIDEO - चक्क मगरीसमोर गेलं कासव; पुढे जे घडलं ते पाहून विश्वासच बसणार नाही

VIDEO - चक्क मगरीसमोर गेलं कासव; पुढे जे घडलं ते पाहून विश्वासच बसणार नाही

मगर आणि कासवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 02 डिसेंबर : मगरीचे (Crocodile) बरेच व्हिडीओ (Crocodile video) तुम्ही सोशल मीडियावर (Social media) पाहिले असतील. या व्हिडीओत तुम्ही मगरीला शिकार करताना पाहिलं असेल. कुणीही प्राणी-पक्षी (Animal video) तिच्यासमोर आला की त्याचं वाचणं अशक्यच. मगर त्याच्यावर हल्ला करतेच. अगदी वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणीही जेव्हा पाणी प्यायला जातात तेव्हा ते मगरीच्या भीतीने सावधपणे पाणी पितानाही दिसतात. पण अशाच मगरीच्या समोर अगदी बिनधास्तपणे गेलं ते एक कासव (Crocodile turtle video). कासव आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे (Crocodile turtle friendship video). एका कासवाने चक्क मगरीसमोर जाण्याची डेअरिंग केली. आता कासव स्वत:हून मगरीसमोर जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात गेल्यासारखंच आहे. पण इथं मात्र उलटंच घडलं. कासव मगरीजवळ गेलं आणि असं काही घडलं की जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. कासवाने मगरीसोबत जे केलं आणि त्यानंतर मगरीने जी प्रतिक्रिया दिली ते पाहून असंही घडू शकतं, याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही. व्हिडीओत पाहू शकता पाण्यात मगर शांतपणे आहे. एक कासव हळूहळू मगरीच्या बाजूने जात असतं. मगरीला पाहिल्यानंतर कोणताही प्राणी मगरीपासून दूर पळाला असता. पण हे कासव मात्र मुद्दामहून आपली दिशा बदलतं आणि मगरीच्या दिशेनं जातं. आता या कासवाचं काही खरं नाही. त्याचा मृत्यू अटळ आहे. असंच आपल्यालाही वाटतं. हे वाचा - VIDEO - तरुणाला पळवून पळवून कोब्राने केला हल्ला; कॅमेऱ्यात कैद झालं खतरनाक दृश्य पण अरे हे काय. कासव मगरीजवळ फक्त जात नाही तर तिला स्पर्श करतानाही दिसतो. कासव अगदी मगरीच्या हाताला आपला हात लावतो. तो चक्क मगरीला हाय फाईव्ह करताना दिसतो. जणू काही दोघंही एकमेकांना हात मिळवत अभिवादन करत आहेत. त्यावेळी मगरही अगदी शांत असते. मगरीसाठी समोर येणारा प्रत्येक जण हा तिची शिकार असतो. अशात या कासवाने तिला स्पर्श केल्यानंतरही तिनं त्याला काहीच केलं नाही. उलट तिनं शांत राहून कासवाचं अभिवादन स्वीकारलं. हे वाचा - Shocking video : महाकाय अजगराच्या तोंडात डोकं; जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड @Saket_Badola ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आत्मविश्वासाच्या पातळीची कल्पना करू शकता, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्स हैराण झाले आहे. याला कासव आणि मगरीची मैत्री म्हटलं जातं आहे. या दोघांची ही मैत्री सर्वांना आवडली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या