सोनिया मिश्रा, प्रतिनिधी चमोली, 6 जुलै : आजकाल फिटनेसचा जमाना आहे. प्रत्येकाचा कल फिट राहण्याकडे असतो. त्यासाठी खास प्रशिक्षकही नेमले जातात. काहीजण वजन कमी करण्यासाठी डायट, जिम करतात, तर काहीजण वजन वाढवण्यासाठी डायट, जिम करतात. अशाच एका ध्येयातून उत्तराखंडची पहिली महिला बॉडीबिल्डर तयार झाली. तिचं नाव आहे प्रतिभा. दोन मुलांची आई असलेल्या प्रतिभा थपलियाल यांना थायरॉईडवर मात करण्यासाठी डॉक्टरांनी जिम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला एवढा मनावर घेतला की, त्या व्यायाम करून बॉडी बिल्डर झाल्या. यंदा 6 ते 12 सप्टेंबर रोजी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आणि 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियात होणाऱ्या आशिया आणि विश्व बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी संपूर्ण भारतातून प्रतिभा थपलियाल यांची निवड झाली आहे. या स्पर्धांमध्ये त्या एकट्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
प्रतिभा यांचं बालपण ऋषिकेशमध्ये गेलं. त्यांनी शिक्षणही तिथेच घेतलं. हिंदी साहित्यात त्या पदव्युत्तर पदवीधर आहेत. शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्राकडे त्यांचा विशेष कल होता. त्यांनी व्हॉलीबॉल खेळात कर्णधार म्हणून उत्तराखंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्या राज्यीय आणि राष्ट्रीय स्तरावर सामने खेळल्या आहेत. राणा-अंजलीनंतर आणखी एक रील लाईफ जोडी करणार रिअल लाइफ लग्न, सिद्धार्थ-तितीक्षा रिलेशनमध्ये? दरम्यान, प्रतिभा शाळेत असताना व्हॉलीबॉलसह क्रिकेटही खेळायच्या. जिम सुरू केल्यानंतर त्यांच्या शरीरयष्टीत झालेला बदल पाहून त्यांचे पती भूपेश यांनी त्यांना बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सांगितलं . त्यानंतर प्रतिभा यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये नशीब आजमावलं आणि त्यात त्यांना यश मिळालं.