नुकताच अभिनेत्री तितीक्षाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाला सिद्धार्थ त्यांचा हा रोमँटिक आणि क्यूट फोटो शेअर केला होता.
तू अशी जवळी राहा या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे सर्वांना माहिती आहे.
पण तितीक्षाच्या बर्थडेला सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोवरून दोघे रिलेशनमध्ये असल्याचा अंदाज लावला जातोय.
इतकंच नाही तर तितिक्षानं तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केलेत. त्या फोटोमध्ये देखील तितीक्षाच्या फॅमिलीबरोबर सिद्धार्थ दिसत आहे.
दोघांच्या फोटोवर अभिनेत्री रसिका सुनीलनं, "किती गोड फोटो आहे" असं म्हणत हार्ट इमोजी शेअर केलाय. तर तितीक्षाची बहिण अभिनेत्री खुशबू तावडेनं nazar amulet emoji पोस्ट केलाय. यावरून दोघांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या आहेत.