वॉशिंग्टन, 17 फेब्रुवारी : तुम्ही बरेच वॉटरफॉल म्हणजे पाण्याचे धबधबे पाहिले असतील पण कधी फायरफॉल किंवा आगीचा धबधबा पाहिला आहे का? अशाच आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका डोंगरावरून आग पाण्यासारखी खाली पडते आहे. निसर्गातील अद्भुत असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. निसर्गात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत. हा धबधबाही निसर्गाचा असाच चमत्कारच म्हणूया. तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्हीच पाहा. ज्यात डोंगरावरून आग पाण्यासारखी खाली कोसळताना दिसते आहे. पाण्याऐवजी आग अशी पडताना पाहून अंगावर काटाही येतो. पण तो पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही. आता खरंच हा आगीचा धबधबा प्रत्यक्षात आहे की आणखी काही? आहे तर कुठे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हे वाचा - VIDEO - छोटा म्हणून चुकूनही याच्याजवळ जाऊ नका; इतका खतरनाक की, चावला तरी समजणार नाही पण मिनिटात जीव जाईल हा व्हिडीओ आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील. योसेमाइट नेशनल पार्कमध्ये हा अनोखा वॉटरफॉल हॉर्सटेल फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. हा धबधबा वर्षातून एकदाच पाहायला मिळतो. दर वर्षी फेब्रवारी महिन्यात तो दिसतो. तसा प्रत्यक्षात हा धबधबा आगीचा नाही पाण्याचाच आहे. पण काही क्षणासाठी तो असा लाल रंगाचा होता ज्यामुळे पाण्याऐवजी आग कोसळल्यासारखी वाटते. याचं कारण आहे ते म्हणजे त्यावर पडणारी सूर्यकिरणं. सूर्याची किरणं जेव्हा सरळ रेषेत धबधब्यावर पडतात तेव्हा धबधबा लाल रंगाचा दिसतो. सूर्याची किरणं एवढी प्रखर असतात की धबधबा आगीसारखा दिसतो. कधी कधी तर धबधबा ज्वालामुखी सारखा दिसतो. हे वाचा - काय सांगता! फक्त 99 रुपयांत घर; ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय स्वस्त घरखरेदीची संधी योसेमाइट नेशनल पार्कमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सूर्य 90 डिग्रीवर असतो तेव्हा हे अद्भुत दृश्य पाहायाल मिळतं. हा चमत्कारिक क्षण काही मिनिटंच पाहायला मिळतो.
Our view of Yosemite Firefall 2023 on 2/12. Every year with enough water and sunlight in mid-February, the sun catches Horsetail Falls and makes it look like falling lava. #firefall2023 pic.twitter.com/9HQwJAfAbc
— Ralph B. McLaughlin (@HousingRalph) February 13, 2023
@HousingRalph ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा धबधबा कसा वाटला किंवा निसर्गातील असे काही अद्भुत चमत्कार तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.