नवी दिल्ली 25 डिसेंबर : ट्रॅफिक सिग्नल तोडणं भारतात सामान्य आहे. इथे लोक खूप घाईत राहतात आणि त्या घाईत त्यांना ट्रॅफिक सिग्नल हिरवा आहे की लाल हे देखील दिसत नाही, संधी मिळताच ते लगेचच निघून जातात. मात्र, या घाईमुळे कधी-कधी लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. म्हणूनच लोकांना नेहमी वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून अपघात देखील टाळता येतील. सध्या ट्रॅफिक सिग्नलवरील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अतिशय धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. पाठलाग करत कांगारूचा व्यक्तीवर जबर हल्ला; हैराण करणारा Video Viral व्हिडिओमध्ये दिसतं की पोलिसांनी ट्रॅफिक सिग्नलवर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला थांबवण्याची अवलंबलेली पद्धत इतकी धोकादायक होती की, दुचाकी पोलिसांच्या गाडीलाच धडकली. यानंतर तिथे भीषण आग लागली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलिसांची गाडी ट्रॅफिक सिग्नलच्या पुढे जाते आणि थांबते. यानंतर एक भरधाव दुचाकी येते आणि ती थेट पोलिसांच्या गाडीला धडकते.
Cop Stops Motorcyclist by Pulling Out In Front of Them 😳 pic.twitter.com/eV4OmpzVBP
— Hall of Fame Post (@hofpost) December 18, 2022
ही बाईक पोलिसांच्या गाडीला धडकताच तिथे अचानक आगीच्या ज्वाला उठतात. ट्रॅफिक सिग्नलवर वाहन थांबवण्यासाठी पोलिसांनी अशी पद्धत अवलंबलेली तुम्ही क्वचितच पाहिली असेल. या अपघातात किती नुकसान झाले, किती लोक जखमी झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वाघाच्या तावडीत सापडलाच होता वानर तेवढ्यात… हृदयाचा ठोका चुकवणारा Video हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HoodLeakTV नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ 1 लाख 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अशा प्रकारे दुचाकीस्वाराला अजिबात रोखू नये, असं काहीजण सांगत आहेत, तर काहीजण हा सरळ सरळ खून असल्याचं म्हणत आहेत.