नवी दिल्ली 24 डिसेंबर : जगात प्राण्यांच्या हजारो प्रजाती आढळतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक आहेत, तर काही शांत प्राणी आहेत. कांगारू हा प्राणी जरी तुम्ही पाहिला नसला तरी त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. कारण हा प्राणी मुळात फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कांगारू हा जगातील एकमेव असा महाकाय प्राणी आहे, जो उडी मारून चालतो. हा प्राणी शाकाहारी असला आणि गवत खात असला तरी तो भरपूर रागीट असतो. राग येताच ते कोणावरही हल्ला करतात. वाघाच्या तावडीत सापडलाच होता वानर तेवढ्यात… हृदयाचा ठोका चुकवणारा Video सोशल मीडियावर सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात कांगारू एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती अगदी धावत पळत झाडाच्या जवळ येतो, कारण एक कांगारू त्याच्या मागे धावत आहे. झाडाजवळ येताच तो पडतो, अशा स्थितीत कांगारू त्याला पायाने लाथ मारतं आणि या व्यक्तीच्या समोर जाऊन उभा राहातं. मग हा व्यक्ती उभा राहताच कांगारूला घाबरवण्यासाठी एक काठीही उचलतो, पण घाबरण्याऐवजी कांगारू त्याच्यावर आणखीच हल्ला करू लागतं.
Man gets “jumped” by a Kangaroo and fights back 👀🤯pic.twitter.com/nIXoqy28Pt
— Daily Loud (@DailyLoud) December 22, 2022
दोन माणसांप्रमाणेच दोघांमध्येही लढत होते, ज्यामध्ये हा व्यक्ती जिंकलेला दिसतो, कारण त्याने कांगारूला जमिनीवर आपटलं आणि त्यावर बसला. मात्र शेवटी कोण जिंकलं हे काही सांगता येत नाही, कारण कांगारू शक्तिशाली प्राणी आहे. तरुणांच्या त्या कृत्याचा म्हशीने घेतला बदला; दुचाकीचा पाठलाग करत शिंगावर उचललं अन्..; Video Viral कांगारू आणि या व्यक्तीच्या भांडणाचा हा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहे, जो @DailyLoud नावाच्या आयडीवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3.7 मिलियन म्हणजेच 37 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 14 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केला आहे. व्हिडिओ पाहणारे लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोक ही फाईट पाहून थक्क झाले आहेत तर काहींनी हसू आवरत नाही.