क्वालालांपूर, 23 फेब्रुवारी : नवरा-बायको (Husband wife divorce) म्हटलं की त्यांच्यामध्ये छोट्यामोठ्या कारणांवरून वाद, भांडणं होत असतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. घटस्फोटाची बरीच कारणे असतात पण एका महिलेने तर चक्क एका अंडरवेअरमुळे आपल्या पतीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे (Divorce On Underwear). मलेशियात राहणाऱ्या ऐमझामा (Aimzama) नावाच्या व्यक्तीच्या संसारात एका अंडरविअरमुळे मोठं वादळ आलं. इतकं मोठं की त्याचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला. त्याच्या बायकोने त्याला सोडण्याची धमकी दिली. या व्यक्तीने सोशल मीडिया आपली व्यथा मांडली आहे. ट्विटरवर त्याने पोस्ट केली आहे. असं या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं पाहूया. हे वाचा - OMG! प्रेग्नंट महिलेने खांद्यावर उचललं वजन आणि… VIDEO पाहून नेटिझन्स शॉक या व्यक्तीने सांगितलं की, त्याला आपल्या घराच्या बाल्कनीत महिलेची एक अंडवेअर सापडली. त्यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. त्याने ती अंडरवेअर उचलून आपल्या घरात ठेवली कारण ती आपल्या पत्नीची असावी असं त्याला वाटलं. पण या अंडरवेअरमुळे संसार धोक्यात येईल असा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता.
जेव्हा त्याची पत्नी घरी परतली तेव्हा या अंडरवेअरवर तिची नजर पडली आणि ती भडकली आणि तिने त्याला घटस्फोट देण्याची धमकी दिली. कारण ही अंडरवेअर तिची नव्हती, त्यामुळे आपला नवरा घरात दुसऱ्या महिलेला घेऊन आल्याचा आरोप तिने त्याच्यावर लावला. हे वाचा - वर्ल्ड रेकॉर्डसाठी हाय हिल्स घालून दोरीवर चढली महिला आणि…; धडकी भरवणारा VIDEO या व्यक्तीचा हा किस्सा ऐकल्यानंतर काही लोकांना त्याची दया आली, तर काहींना हसू आलं. काहींनी त्याला अशावेळी कसा बचाव करायचा याबाबत टीप्सही दिला. तर एका व्यक्तीने आपल्यासोबतही असंच घडल्याचं सांगितलं.