नवी दिल्ली 07 एप्रिल : लग्नाच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडला तर वातावरण थोडं तणावाचं होतं. यानंतर ही घटना लोकांना आयुष्यभर आठवते. आणखी एक गोष्ट म्हणजे लग्नाच्या स्टेजवर (Wedding Stage) घडलेली घटना तर कॅमेऱ्यातही कैद होते. सध्या लग्नाच्या स्टेजवर घडलेली अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली, याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. यात दिसतं की एक व्यक्ती वधू आणि वराच्या (Bride and Groom) मध्ये जाऊन उभा राहिला. इतक्यात मागून कुणीतरी त्याची मस्करी केली आणि यामुळे तो भलताच भडकला. यानंतर लग्नाचं स्टेज थेट कुस्तीच्या आखाड्यात बदललं.
सुसाट कार वळणावर झाली आऊटऑफ कंट्रोल, 4 पलट्या मारूनच थांबली, LIVE VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Wedding Video) वरमाळा समारंभ संपल्यानंतर वधू-वर स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिथे येऊन मध्येच उभी राहाते. कॅमेरामन फोटो काढण्यासाठी समोर बघायला सांगतो. यादरम्यान मागून कोणीतरी येऊन त्या व्यक्तीची मस्करी केली. काही सेकंद या व्यक्तीच्या काहीच लक्षात आलं नाही, पण नंतर आपली कोणीतरी मस्करी केल्याचं लक्षात येताच, तो भलताच भडकला.
एक सेकंदाचाही वेळ न घालवता तो रागाने मागे वळून पाहतो आणि मग त्या व्यक्तीला मारायला लागतो. मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर रेकॉर्ड होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही. आपली मस्करी केल्यानं तो इतका भडकला होता, की त्याने मस्करी करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
स्विमिंग पूलमध्ये खेळत होती लहान मुलं; अचानक भलामोठा अजगर पाण्यात आला आणि…; Shocking
इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, ‘अरे इतका राग.’