जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आता माझी सटकली! मान पकडताच कोंबड्याचा कुत्र्यावर हल्लाबोल; खतरनाक Fighting Video

आता माझी सटकली! मान पकडताच कोंबड्याचा कुत्र्यावर हल्लाबोल; खतरनाक Fighting Video

आता माझी सटकली! मान पकडताच कोंबड्याचा कुत्र्यावर हल्लाबोल; खतरनाक Fighting Video

कोंबडा आणि कुत्र्यामध्ये अशी फायटिंग (Fight Between Dog And Cock) तुम्ही कधीच पाहिली नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 फेब्रुवारी :  कुत्रे (dog) कोंबड्याचा (cock) पाठलाग करतात किंवा त्यांना त्रास देतात. असं बऱ्याचदा तुम्ही पाहिलं आहे. कुत्रा जवळ येताच कोंबडे तिथून धूम ठोकतात त्यांच्यापासून पळण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या सोशल मीडियावर एका डेअरिंगबाज कोंबड्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यानं कुत्र्याला चांगलीच टक्कर दिली आहे, इतकंच नव्हे तर त्याला सरो की पळो करून सोडलं. सोशल मीडियावर सध्या कुत्रा आणि कोंबड्याची जबरदस्त फायटिंग (Fight Between Dog And Cock) पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर (Social Media)  हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. आयएएस ऑफिसर अवनीष शरण (IAS Officer Awanish Sharan)  यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता कुत्रा सुरुवातीला कोंबड्यावर भुंकू लागतो. आपल्या भुंकण्यानं कोंबडा आपल्याला घाबरेल असं या कुत्र्याला वाटलं. पण होतं उलटंच कोंबडा त्याला न घाबरता त्याच्याशी चांगलाच सामना करतो. कुत्र्याच्या जवळ तो येतो आणि आपल्या चोचीनं त्याच्यावर हल्ला करतो. त्याला जोरजोरात चोच मारू लागतो. थोडा वेळ कुत्रा शांत होतो. दोघंही एकमेकांकडे बघतात. काही क्षणानं कुत्रा कोंबड्याची मान पकडण्याचा प्रयत्न करतो. पण कोंबडा काही मागे हटत नाही. तो आपली पिसं उडवत, हवेत उडत कुत्र्यावर हल्ला करतो. हे वाचा -  नाकातोंडातून काढला बॉल, कान-डोळ्यातून नाणं; कधीच पाहिली नसेल अशी भन्नाट जादू या कोंबड्यासमोर आपलं काही चालत नाही, हे कुत्र्याच्याही लक्षात येतं. त्यामुळे या लढाईत हार मानत तो काढता पाय घेतो आणि तिथून पळ काढतो. मग कोंबड्याला इतका राग आलेला आहे, की तो सहजासहजी कुत्र्याचा पाठलाग सोडत नाही, त्याला असं शांतपणे जाऊ देत नाही. कुत्रा तिथून पळून गेल्यावर शांतपणे न राहता कोंबडा त्याची पाठ धरतो. त्याच्या मागे मागे पळतो. कुत्रा कोंबड्याला इतका घाबरलेला आहे, की कोंबडा मागे आल्यावर तो त्याचीशी पुन्हा पंगा घेण्याचा प्रयत्नही करत नाही. तिथून धूमच ठोकतो. हे वाचा -  बापरे! पेट्रोल ऐवजी पाइपमधून निघाला किंग कोब्रा; पंपावर नागरिकांची धावाधाव अवनीष शरण यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, बस्स फक्त आत्मविश्वास आणि धैर्यानं सामना करा. बाजी कधीची पलटू शकते. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे, त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: dog , Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात