चेन्नई, 12 नोव्हेंबर : नवरा-बायको म्हटलं की त्यांच्यात वाद हे होतातच. अगदी जेवणावरूनही. कधी तिखट झालं म्हणून तर कधी मीठ कमी झालं म्हणून, तर एखादा पदार्थ आवडत नाही तर का बनवला म्हणून... पण अशाच भांडणानंतर तामिळनाडूतील एका दाम्पत्याचा जीव गेला आहे. पती-पत्नीमध्ये बिर्याणी खाण्यावरून वाद झाला. दोघंही भांड भांड भांडले पण भांडणाचा शेवट मात्र धक्कादायक झाला.
चेन्नईच्या अयानावरमधील ही घटना आहे. 74 वर्षांचे करुणाकरण आणि त्यांची 70 वर्षांची पत्नी पद्मावती या दापम्त्याचा बिर्याणीवरून झालेल्या वादात मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य एकटं राहत होतं. त्यांची चारही मुलं आपल्या कुटुंबासह वेगळे राहतात. बुधवारी रात्री शेजाऱ्यांना या दाम्पत्याच्या घरातून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
हे वाचा - 2 राज्यांचे पोलीस शोधत आहेत चोरीला गेलेली चप्पल; नेमकं प्रकरण तरी काय?
एशियानेट न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळी जाण्याआधी पती-पत्नीने स्वतःला आग लावून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला असावा असं त्यांना वाटलं. पण मृत्यूआधी पद्मावतीने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली. बिर्याणीवरून त्यांचं भांडणं सुरू झालं होतं आणि हाच वाद त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला.
करुणाकरणने एका रेस्टॉरंटमधून बिर्याणी ऑर्डर केली आणि तो एकटाच खात होता. आपल्याला आपल्या नवऱ्याने बिर्याणी न देता एकट्याने खाल्ल्याने पद्मावतीला राग आला. तिने करुणाकरणसोबत वाद घातला आणि त्यांचं भांडण झालं. त्यानंतर करुणाकरणने रागात पद्मावतीला आग लावली. यानंतर आगीत पेटलेल्या पद्मावतीने आपल्या पतीला मिठी मारली, यामुळे तोसुद्धा आगीत पेटला.
हे वाचा - BP लो झाल्याने सरकारी रुग्णालयात गेली महिला, डॉक्टरने भयानक पद्धतीने केले उपचार; VIDEO VIRAL
दोघांनाही एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोघांचाही मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Couple, Tamilnadu, Viral, Wife and husband