मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नाचा मांडव बनला आखाडा, डीजेवरून पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी; पाहा राड्याचा VIDEO

लग्नाचा मांडव बनला आखाडा, डीजेवरून पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी; पाहा राड्याचा VIDEO

लग्नात डीजेवरून झालेल्या वादानंतर वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये (Fight in marriage ceremony over DJ police intervenes) तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

लग्नात डीजेवरून झालेल्या वादानंतर वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये (Fight in marriage ceremony over DJ police intervenes) तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

लग्नात डीजेवरून झालेल्या वादानंतर वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये (Fight in marriage ceremony over DJ police intervenes) तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

डफतेहपूर, 30 नोव्हेंबर: लग्नात डीजेवरून झालेल्या वादानंतर वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये (Fight in marriage ceremony over DJ police intervenes) तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नात जेवण होण्यापूर्वी डिजे लावण्यात आला होता. त्याच्या गाण्यावर (Fight over DJ dance) ठेका धरण्यासाठी वऱ्हाडी मंडळींमध्ये चढाओढ लागली होती. यावेळी असं काही तरी घडलं ज्यामुळे डान्स करणारे वऱ्हाडी अचानक भांडू लागले आणि एकमेकांवर तुटून पडले. या घटनेचा व्हिडिओ काहीजणांनी रेकॉर्ड करून (Social media viral) सोशल मीडियावर अपलोड केला आहे. " isDesktop="true" id="637231" >

एकमेकांना मारल्या खुर्च्या

लग्नसमारंभात डीजे आणणं, ही आजकालची स्टाईल बनली आहे. लग्नाचं जेवण होण्यापूर्वी डीजेच्या तालावर नाचायला वऱ्हाडी मंडळींना आवडतं. अनेक ठिकाणी मद्यपानाचीही सोय करण्यात येते. दारुच्या नशेत झिंगणारे वऱ्हाडी डीजेच्या तालावर अनेक तास थिरकताना दिसतं. काहीजण तर लग्नात नाचण्यासाठीच येत असतात आणि दारुच्या नशेत झिंगत लग्न एन्जॉय करत असतात. घटनेच्या दिवशी अशाच प्रकारे डीजेच्या तालावर नाचायला वऱ्हाडी मंडळींनी सुरुवात केली होती. मात्र काही वेळातच त्याचं भांडणात रुपांतर झालं. किरकोळ कारणावरून प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचलं आणि काही वेळातच वऱ्हाडी मंडळी एकमेकांना मारहाण करू लागली. काहीजणांनी तिथं ठेवलेल्या खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकायला सुरुवात केली.

पोलिसांनी केली मध्यस्थी

या घटनेची माहिती काहीजणांनी स्थानिक पोलिसांना फोनवरून कळवली. ती समजल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. वऱ्हाडी मंडळींना त्यांनी एकमेकांपासून वेगळं केलं आणि त्यांच्यातील भांडणं शांत केली. डीजेवर नाचण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून वऱ्हाडी मंडळी एकमेकांशी भांडत असल्याबद्दल आजूबाजूच्या नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

हे वाचा- निष्पाप मुलाने पाहिला 5 मिनिटांचा सिनेमा, मिळाली 14 वर्षांची शिक्षा

यापूर्वीही झाला होता राडा

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर भागात लग्न सुरू असताना जोरदार गोंधळ झाला होता. ज्या व्यक्तीचं लग्न होतं, त्याची पहिली पत्नी अचानक घटनास्थळी दाखल झाली आणि वाद सुरु झाले. यावेळी पहिल्या पत्नीसोबत आलेले तिचे नातेवाईक आणि दुसऱ्या पत्नीचे नातेवाईक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. बराच काळ त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

First published:

Tags: Crime, Marriage, Police