जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / निष्पाप मुलाने पाहिला 5 मिनिटांचा सिनेमा, मिळाली 14 वर्षांची शिक्षा

निष्पाप मुलाने पाहिला 5 मिनिटांचा सिनेमा, मिळाली 14 वर्षांची शिक्षा

निष्पाप मुलाने पाहिला 5 मिनिटांचा सिनेमा, मिळाली 14 वर्षांची शिक्षा

केवळ 5 मिनिटं सिनेमा पाहिल्याबद्दल एका 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला 14 वर्षांच्या कारावासाची (14 years of jail to the kid just for watching 5 min film) शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्योनयांग, 30 नोव्हेंबर: केवळ 5 मिनिटं सिनेमा पाहिल्याबद्दल एका 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला 14 वर्षांच्या कारावासाची (14 years of jail to the kid just for watching 5 min film) शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आपल्या हुकूमशाहीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या (Stringent punishment in North Korea) उत्तर कोरियात हा प्रकार घडला आहे. या देशातील काही नियम हे तालिबानलाही लाजवतील, असे असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. वास्तविक, सिनेमा पाहणं हा अनेकांच्या आवडीचा भाग असतो. काहीजण मनोरंजनासाठी हा सिनेमा पाहतात, तर लहान मुलांना त्यात थ्रील वाटत असतं. मात्र असा एक सिनेमा पाहणं एका चिमुरड्याला चांगलंच महागात पडलं आहे.

हुकूमशहा किम जोंग उननं उत्तर कोरियात मनमानी कायदे केले आहेत.

शस्त्रूराष्ट्राचा सिनेमा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे एकमेकांचे शत्रू देश मानले जातात. त्यामुळे दक्षिण कोरियातील एकही सिनेमा देशवासियांनी पाहू नये, असा नियम किम जोंग यांनी केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने शत्रूराष्ट्रातील सिनेमा पाहिला, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येते. यात सिनेमा पाहणाऱ्या व्यक्तीचं वयदेखील लक्षात घेतलं जात नाही. शाळकरी वयातील एका मुलाने हा सिनेमा पाहिला, तेव्हा तो दक्षिण कोरियातील आहे, याची त्याला कदाचित कल्पनाही नसेल. मात्र या किरकोळ गोष्टीवरून त्याला उत्तर कोरियाच्या प्रशासनानं सक्त मजुरीसह 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे वाचा-  आरोग्य अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेचा लैंगिक छळ; जबरदस्ती फिरायला घेऊन गेला अन्… आईवडिलांनाही होऊ शकते शिक्षा या मुलावर लक्ष न ठेवल्याप्रकऱणी त्याच्या आईवडिलांवरदेखील कारवाई होऊ शकते, अशी माहिती उत्तर कोरियातील सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी अशाच प्रकारे सिनेमा पाहण्याच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या मुलाच्या आईवडिलांना छावण्यांमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे या मुलाचे आईवडिलदेखील चिंतेत आहेत. एकीकडे आपल्या मुलाची पुढची 14 वर्षे तुरुंगात जाणार असल्याच्या कल्पनेने त्यांना झोप लागत नाही, तर दुसरीकडे त्यांच्यावरदेखील सरकारकडून नेमकी काय कारवाई येईल, याचा भरवसा नसल्यामुळे ते कमालीच्या दहशतीखाली वावरत आहेत. गुन्हा करणाऱ्या मुलांच्या पालकांना 16 हजारांचा दंडही ठोठावण्यात येतो. उत्तर कोरियाच्या दृष्टीने विचार करता हा खूप मोठा दंड आहे. या देशातील लोकांचं उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे त्यांच्यासाठी दंडाची ही रक्कम भलीमोठी ठरते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात