चेन्नई 27 एप्रिल : चेन्नईमध्ये बस स्टॉपवर दोन कॉलेजच्या दोन विद्यार्थीनींमध्ये प्रचंड वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यात थेट हाणामारी सुरू झाली. पुढे ही भांडणं इतकी टोकाला गेली की या तरुणीला एकमेकींना जमिनीवर पाडून मारू लागल्या (Fight Between College Students on Bus Stop). यासोबतच नंतर इतर अनेक मुलीही या भांडणात सामील झाल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Shocking Video of Girls Fight) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Shocking! आकाशात एका विमानातून दुसऱ्या विमानात जाण्यासाठी उडी मारली पण…; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO समोर आलेल्या माहितीनुसार, मुलींमधील मारहाणीची ही घटना 26 एप्रिलची (मंगळवार) आहे. उत्तर चेन्नईतील न्यू वॉशरमनपेट येथील बसस्थानकावर महाविद्यालयीन मुली बसची वाट पाहत होत्या. यादरम्यान दोन मुलींमध्ये वाद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बसस्थानकावरच या वादाचं हाणामारीत रुपांतर झालं. विद्यार्थिनींचे गट आपसात भिडल्याचं याठिकाणी पाहायला मिळालं.
हा सगळा प्रकार पाहून तिथे उभे असलेले इतर लोकही हैराण झाले. काही लोकांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांना जमिनीवर पाडून मारामारी करताना दिसत आहेत. यावेळी काही पोलीस गस्तीवर होते. त्यांनी ही मारामारी पाहिली आणि पुढे धावत घेत भांडणात सहभागी मुलींना वेगळं केलं. यानंतर विद्यार्थिनींना इशारा देऊन सोडण्यात आलं.

)







