Home /News /viral /

Shocking! आकाशात एका विमानातून दुसऱ्या विमानात जाण्यासाठी उडी मारली पण...; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Shocking! आकाशात एका विमानातून दुसऱ्या विमानात जाण्यासाठी उडी मारली पण...; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

दोन पायलट्सनी आकाशात उडत्या विमानं बदलण्याचा निर्णय घेतला आणि जे घडलं ते धडकी भरवणारं आहे.

    मुंबई, 26 एप्रिल : एका चालत्या बाईकवरून दुसऱ्या चालत्या बाईकवर किंवा एका चालत्या कारमधून दुसऱ्या चालत्या कारमध्ये जाणं हे दृश्य तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल किंवा प्रत्यक्षात काही लोक प्रसिद्धीसाठी असे खतरनाक स्टंटही करताना दिसतात. रस्त्यावरील असे जीवघेणे स्टंट पाहूनच धडकी भरते. विचार करा, असे स्टंट आकाशात करण्याचा कुणी प्रयत्न केला तर... म्हणजे विमानात असं कुणी केलं तर...(Plane swap video) असाच एक शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Dangerous Stunt video). विमानांच्या तशा आकाशातील बऱ्याच कसरती तुम्ही पाहिल्या असतील. पण  कधी आकाशात कोणत्या पायलट्सनी आपली विमानं बदलल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात दोन उडत्या विमानांच्या पायलट्सनी अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला. ल्यूक ऐकिन्स (Luke Aikins) आणि अँडी फारिंगटन (Andy Farrington) अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघंही भाऊ स्कायडाइव्हर्स आहेत.  त्यांचाआकाशातील हा खतरनाक स्टंट (Sky Divers stunt video) पाहूनच धडकी भरेल. अंगावर काटा येईल. दोघंही आपल्या विमानातून एका ठरलेल्या उंचीपर्यंत गेले. व्हिडीओत पाहू शकता, दोन विमानं हवेत उडत आहेत. त्यानंतर दोन्ही विमानातील चालकांनी विमानातून उडी मारली आणि एकमेकांच्या विमानात बसण्याचा प्रयत्न करू लागले. हवेत ते लटकताना दिसत आहे. पण त्यांच्या याच प्रयत्नात एक प्लेन क्रॅश झालं. ज्या विमानात फारिंगटनला जायचं होतं, ते आऊट ऑफ कंट्रोल झालं आणि वेगाने येऊ लागलं. त्यामुळे फारिंगटन त्या विमानात जाऊ शकला नाही आणि आपला स्टंट पूर्ण करू शकला नाही. अखेर त्याने पॅराशूटच्या मदतीने लँड केलं. तर ऐकिन्स आपला स्टंट पूर्ण करणयात यशस्वी ठरला. फारिंगटन म्हणाला, दोघांनीही सुरक्षित राहणं हा प्लॅनचा सर्वात महत्त्वाचा भाग होता.  झी न्यूज हिंदीने यूएस टुडेचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार ऐकिन्सने आपण पुन्हा असं करणार असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या