नवी दिल्ली 23 डिसेंबर : आजकाल सोशल मीडियाची क्रेझ प्रचंड आहे. यूजर्स दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत राहतात. यातील काही व्हिडिओ विचारात पाडणारे असतात तर काही भावुक करणारे. असेही काही व्हिडिओ समोर येतात जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. तर काही व्हिडिओ असेही असतात जे आपल्याला असा धडा देतात की जो जगातील कोणतंही पुस्तक देऊ शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यात एका म्हशीने तरुणांना चांगलीच अद्दल घडवल्याचं पाहायला मिळतं. चिमुकलीवर हल्ला करत होती मेंढी; पाळीव श्वानाने धावत येत असा वाचवला जीव, पाहा VIDEO गीतेत लिहिलं आहे की, मनुष्य जे कर्म करतो, त्याचं फळ त्याला मिळतं. जर तुम्ही एखाद्याचं चांगलं केलं तर तुमचंही चांगलंच होईल आणि जर तुम्ही कोणाचं वाईट केलं तर तुमचंही वाईट होईल. कर्म तुम्हाला कधीच सोडत नाही. असाच काहीसा प्रकार या तरुणांसोबत घडला. दुचाकीवर बसलेल्या दोन मुलांनी तिथून जाणाऱ्या म्हशीची छेड काढण्यास सुरुवात केली. खरंतर ते म्हशीसमोर बाईक घेऊन आवाज करू लागतात, त्यामुळे म्हैस अस्वस्थ होते आणि त्यांना धडा शिकवते.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन तरुण एका म्हशीच्या समोर बाईकवर बसलेली आहेत. ते खूप जोरात बाईक स्टार्ट करतात आणि गाडीचा आवाज ऐकून म्हैस विचलित होते. हे तरुण आपली बाईक पुढे घेऊन जाताच म्हैसही त्यांचा पाठलाग करते. यानंतर म्हैस त्यांच्यावर हल्ला करून त्यांना खाली पाडते. दुसरी म्हैसही मागे धावत येते आणि तीही त्यांच्यावर हल्ला करते. बाईक ज्या वेगात होती, त्यानुसार या तरुणांना किती दुखापत झाली असेल हे स्पष्टपणे कळतं. VIDEO: अचानक दुचाकीस्वारासमोर येऊन उभा राहिला वाघ अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं ‘Fun Viral Vids’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ 36 हजार वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला शेकडो लोकांनी लाइक केलं आहे. व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंटही केल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की- ‘याला कर्माचं फळ म्हणतात’, तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ‘हे मुक्या प्राण्यांना त्रास दिल्याचं फळ आहे’, तिसऱ्या यूजरने लिहिलं - ‘जशी करणी तशी भरणी’. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.