Home /News /viral /

शेकडो लोकांसमोर कुटुंबाला लुटलं! चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला तेव्हा गर्दीतील लोकांनी VIDEO काढला पण...

शेकडो लोकांसमोर कुटुंबाला लुटलं! चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला तेव्हा गर्दीतील लोकांनी VIDEO काढला पण...

समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या कुटुंबाला चक्क चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात आलं. हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या घडला.

    दमण, 06 ऑक्टोबर : दिवसाढवळ्या चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र दमणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या कुटुंबाला चक्क चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात आलं. हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या घडला. मुख्य म्हणजे यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होती. मात्र या कुटुंबाच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका इसम कुटुंबाची मदत करण्याएवजी फोनमध्ये व्हिडीओ काढत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात चाकू घेऊन धमकावत असल्याचे दिसत आहे. एका इसमाला जमिनीवर झोपवून त्याला लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे. वाचा-नशेत धुंद असणारी महिला थेट पडली वॉशिंगमशीनमध्ये पुढे काय झालं पाहा VIDEO शेजारी असलेले त्याचे बाळ रडतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र या सगळ्यात आश्चर्यांची बाब म्हणजे या कुटुंबाची मदत करण्यासाठी किंवा या चोराला पकडण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही. उलट लोकं या सगळ्याचा व्हिडीओ काढत होते. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये हा चोर पळूनही जाताना दिसत आहे. वाचा-सोशल मीडिया वापरणारी बायको नको! बंगाली वकिलानं ठेवली लग्नासाठी अजब अट वाचा-हातात खडू पकडायला बोटं नाही, पण प्रतिभा खचल्या नाही; जगण्याला बळ देणारा VIDEO सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. चोरी झालेल्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली असून, या व्हिडीओच्या मदतीनं पोलीस चोराचा शोध घेत आहेत. मात्र शेकडो लोकं उपस्थित असूनही कोणी मदत न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या