जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नशेत धुंद असणारी महिला थेट पडली वॉशिंगमशीनमध्ये पुढे काय झालं पाहा VIDEO

नशेत धुंद असणारी महिला थेट पडली वॉशिंगमशीनमध्ये पुढे काय झालं पाहा VIDEO

नशेत धुंद असणारी महिला थेट पडली वॉशिंगमशीनमध्ये पुढे काय झालं पाहा VIDEO

रोजी कोल ही 21 वर्षीय विद्यार्थिनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत ही वाइन घेत होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑक्टोबर : नशेत लोक काय करतील याचा काही थांब पत्ताच नाही. कधी जुगाड करतात तर कधी मजेशीर काहीतरी करतात तर कधीतरी हीच नशा त्यांच्या जीवावर बेतू शकते. असाच एक भयंकर प्रकार समोर आाला आहे. एका महिलेनं खूप जास्त मद्यपान केलं होतं आणि ही महिला घरातल्या वॉशिंगमशीनमध्ये तोल जाऊन पडली. या घटनेमुळे घरात गोंधळ उडाला. या महिलेला वॉशिंगमशीमधून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला मात्र या महिलेचं अर्ध शरीर वॉशिंगमशीनमध्ये अडकलं होतं. महिला अर्धी बाहेर आणि अर्धी मशीनमध्ये अशी अवस्था झाली होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात

हे वाचा- डोळ्यांची पापणी मिटेपर्यंत ‘बुलेट ट्रेन’ गायब, पाहा काळजात धडकी भरवणारा VIDEO रोजी कोल ही 21 वर्षीय विद्यार्थिनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत ही वाइन घेत होती. त्याचवेळी तिने टकिला शॉट्स मारले आणि तिला चढले. मशेत असलेल्या महिलेनं वॉशिंगमशीनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ती अडकली. सुरुवातीला मित्र-मैत्रिणींनी या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री 11 वाजता त्यांना तातडीनं आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला कळवलं आणि या महिलाला रेस्क्यू करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात