• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच जमावाचं राक्षसी कृत्य, महिला टिकटॉकरला हवेत फेकून फाडले कपडे, Shocking Video

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच जमावाचं राक्षसी कृत्य, महिला टिकटॉकरला हवेत फेकून फाडले कपडे, Shocking Video

तिनं सांगितलं, प्रचंड गर्दी होती आणि हे सर्व लोक आमच्याकडे येत होते. लोक मला धक्का देत होते आणि इतक्या जोरजोरात ओढत होते की त्यांनी माझे कपडेही फाडले (Female TikToker's Clothes Torn by Mob) .

 • Share this:
  लाहोर 18 ऑगस्ट : एका महिला टिकटॉकरनं असा आरोप केला आहे, की स्वातंत्र्यदिनीच काही लोकांनी तिला आणि तिच्या साथीदारांना मारहाण (Female TikToker Was Allegedly Harassed) केली आहे. लाहोर पोलिसांनी ग्रेटर इकबाल पार्क (Greater Iqbal Park) येथे झालेल्या या गोंधळाप्रकरणी शेकडो अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉननं वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचं असं म्हणणं आहे, की ती आपल्या सहा साथीदारांसह स्वातंत्र्य दिनानिमित्त मिनार ए पाकिस्तानजवळ (Pakistan) एक व्हिडिओ बनवत होती. याचवेळी तब्बल 300 ते 400 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. VIDEO- यांच्यापेक्षा जनावरं बरी! प्राणीसंग्रहालयात एकमेकांच्या जीवावर उठली माणसं तक्रारीत तिनं म्हटलं, की मी आणि माझ्या साथीदारांनी या लोकांपासून वाचण्याचा भरपूर प्रयत्न केला. स्थिती पाहून पार्कमधील सुरक्षा गार्डनं मीनार-ए-पाकिस्तानच्या आसपासच्या वाड्याचे गेट उघडले. पुढे तिनं सांगितलं, प्रचंड गर्दी होती आणि हे सर्व लोक आमच्याकडे येत होते. लोक मला धक्का देत होते आणि इतक्या जोरजोरात ओढत होते की त्यांनी माझी कपडेही फाडले (Female TikToker's Clothes Torn by Mob) . काही लोकांनी माझी मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी खूप होती आणि हे लोक मला हवेत फेकत राहिले, असंही ती म्हणाली. VIDEO: हवेतच लष्काराच्या विमानानं घेतला पेट; कॅमेऱ्यात कैद झाला तो थरारक क्षण आपल्या तक्रारीत ही महिला पुढे म्हणाली, की तिच्या साथीदारांनाही मारहाण केली गेली. यादरम्यान तिचे कानातील झुमके आणि अंगठीही जबरदस्ती काढून घेण्यात आली. इतकंच नाही तर तिच्यासोबतच्या आणखी एका व्यक्तीकडील मोबाईल, ओळखपत्र आणि 15,000 रुपयेदेखील चोरी केले गेले. अज्ञातांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात महिलेचे कपडे फाडणं, चोरी आणि दंगा यासारखे विविध गुन्हे दाखल केले आहेत. घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: