जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शिकवणी सोडून शिक्षिकेने सुरू केलं अजब काम; आता दर महिन्याला कमावते 25 लाख रूपये

शिकवणी सोडून शिक्षिकेने सुरू केलं अजब काम; आता दर महिन्याला कमावते 25 लाख रूपये

शिकवणी सोडून शिक्षिकेने सुरू केलं अजब काम; आता दर महिन्याला कमावते 25 लाख रूपये

मोनिकाने सांगितलं की 6 वर्षापूर्वी ती स्विडनमधून अमेरिकेत शिफ्ट झाली आणि डान्स शिकवू (Dance Class) लागली. तिने इन्स्टाग्राम सुरू केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला ओनलीफॅन्सवर अकाऊंट (Account on Onlyfans) सुरू करण्याचा सल्ला दिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : जास्त पैसे कमवण्यासाठी अनेकजण काहीही करायला तयार असतात. मग ते हा विचारही करत नाहीत की पैसे कमवण्यासाठी ते जो रस्ता निवडत आहेत तो बरोबर आहे की चुकीचा. लोक अनेकदा अशी काही कामं सुरू करतात, ज्यातून कमाई भरपूर होते मात्र त्यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. एखाद्या कामाला बरोबर किंवा चुकीचं ठरवणं, हे प्रत्येकाचं आपलं मत असतं. मात्र, यामुळे हे लोक चर्चेत येतात. आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव; सर्वांसमोरच करू लागला असं काम की नवरीही लाजली, Video एका शिक्षिकेबाबतही असंच झालं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, स्विडनची मोनिका हल्ट आधी इतिहासाची शिक्षिका होती. तिच्याकडे बॅचलर डिग्री होती. मात्र तिची कमाई जास्त नव्हती. रिपोर्टनुसार ती महिन्याला 1.5 लाख रुपये कमवत असे. मात्र तेवढ्या पैशात तिचं घर चालत नव्हतं. मग तिने असा काही विचार केला, ज्यामुळे तिची कमाई काही दिवसातच १६ पटीने वाढली. मोनिकाने सांगितलं की 6 वर्षापूर्वी ती स्विडनमधून अमेरिकेत शिफ्ट झाली आणि डान्स शिकवू (Dance Class) लागली. तिने इन्स्टाग्राम सुरू केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला ओनलीफॅन्सवर अकाऊंट (Account on Only fans) सुरू करण्याचा सल्ला दिला. ही नवीनच सब्सक्रीप्शन साईट सुरू झाली होती. तेव्हा तिने या साईटवर अॅडल्ट कंटेट बनवण्यास सुरुवात केली (Female Teacher Became Adult Model). तिचे फॅन्स रातोरात वाढू लागले. कोरोना काळात तर तिचे फॅन्स खूप जास्त वाढले आणि तिच्या न्यूड व्हिडिओची भरपूर मागणी होऊ लागली.

चमत्कार! अख्खं कुटुंबच जुळं; जुळ्या दाम्पत्यांची मुलंही दिसतात Same to same

आता स्वि़डीश बेला नावाने अॅडल्ट कंटेंट इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेल्या मोनिकाने सांगितलं की ती आता महिन्याला 25 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. तिने सांगितलं की ओन्लीफॅन अतिशय सुरक्षित आहे. यातून आता ती देश आणि जगभरात फिरते. आता तिची पूर्ण लाइफस्टाईलच बदलली आहे. कधीकधी ती आपलं शिक्षिकेचं काम मिस करते मात्र ती आनंदी आहे. अनेकदा तिला लोकांचे टोमणेही ऐकावे लागतात. मात्र तिला याचा फरक पडत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात