जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव; सर्वांसमोरच करू लागला असं काम की नवरीही लाजली, Wedding Video

आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव; सर्वांसमोरच करू लागला असं काम की नवरीही लाजली, Wedding Video

आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव; सर्वांसमोरच करू लागला असं काम की नवरीही लाजली, Wedding Video

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमासाठी नवरीबाई अगदी सुंदर डान्स करत एन्ट्री करते. नवरदेव अगदी आतुरतेने तिची वाट बघत असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल (Wedding Video) होत असतात. यात विशेषतः नवरीबाईचे क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. याच कारणामुळे सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक वरमाळेच्या कार्यक्रमाच्या आधीचा नवरीच्या एन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल (Video of Bride Entry) होत आहे. यात दिसतं की उत्साहाच्या भरात नवरदेव स्वतः आवरू शकत नाही आणि सर्वांसमोरच नवरीला उचलून घेऊ लागतो.

100 वर्षाचे आजोबा चढले बोहल्यावर; लग्नाची ही आगळीवेगळी कथा एकदा वाचाच

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमासाठी नवरीबाई अगदी सुंदर डान्स करत एन्ट्री करते. नवरदेव अगदी आतुरतेने तिची वाट बघत असतो. नवरी समोर येताच नवरदेव स्वतःला आवरू शकत नाही आणि तिच्यासोबत गाण्यावर थिरकू लागतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव किती उत्सुक दिसत आहे. डान्स करतानाच तो सर्वांसमोर नवरीला मिठी मारू लागतो. मग तिला उचलून घेणारच असतो, इतक्यात नवरी असं करण्यास नकार देते.

जाहिरात

नवरी आणि नवरदेवाचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर weddingbridgeofficial नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, आतापर्यंतची सर्वात क्यूट ब्रायडल एन्ट्री. 25 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 56 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा वाढतच आहे. तर अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

भांडखोर GF ला BF ने दिलं असं गिफ्ट; आता ती त्याच्यासोबत चुकूनही वाद घालणार नाही

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरचं असं म्हणणं आहे की नवरीची प्रतिक्रिया मनाला स्पर्शून गेली, जेव्हा तिने उत्साही नवरदेवाला सर्वांसमोर उचलून घेण्यापासून रोखलं. दुसऱ्या एका यूजरने मस्करी करत लिहिलं, देशी लग्नही एकता कपूरच्या सीरियलप्रमाणे होत चालली आहेत. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, सो क्यूट, हा व्हिडिओ मला इतका आवडला की मी वारंवार पाहात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात