जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: चिमुकलीला समुद्रात पोहायला शिकवत होते वडील; पाण्यात टाकताच भयानक घडलं

Viral Video: चिमुकलीला समुद्रात पोहायला शिकवत होते वडील; पाण्यात टाकताच भयानक घडलं

चिमुकलीसोबत घडलं भयानक

चिमुकलीसोबत घडलं भयानक

एक वडील आपल्या मुलीला पोहायला शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसले. मुलगीही वडिलांवर विश्वास ठेवून समुद्रात उडी मारायला तयार झाली. मात्र या उडीनंतर जे घडलं, ते पाहून अनेकांना धक्का बसला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 जुलै : एका मुलीसाठी तिचे वडीलच तिचे सुपरहिरो असतात. मुलीचा आपल्या वडिलांवर पूर्ण विश्वास असतो. ती तिच्या सर्व गरजांसाठी वडिलांवर अवलंबून असते. आईचा ओरडा टाळण्यापासून ते बाहेर फिरायला जाण्यापर्यंत कशासाठीही मदत घेताना मुलींना आधी वडिलांचाच चेहरा आठवतो. मुलीचा वडिलांवर इतका विश्वास असतो, की ती डोळे मिटून वडील म्हणतील ते करायला तयार असते. अशा परिस्थितीत आपल्या मुलीचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी वडिलांची असते. अशाच एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यात भलतंच काहीतरी घडल्याचं पाहायला मिळतं. यात एक वडील आपल्या मुलीला पोहायला शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसले. मुलगीही वडिलांवर विश्वास ठेवून समुद्रात उडी मारायला तयार झाली. मात्र या उडीनंतर जे घडलं, ते पाहून अनेकांना धक्का बसला. या व्हिडिओचा शेवट असा झाला, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता.

जाहिरात

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या लहान मुलीला समुद्रात पोहायला कसे शिकवत आहेत, हे तुम्ही पाहू शकता. मुलगी खूप लहान आहे, त्यामुळे वडिलांनी तिच्या दोन्ही हातात एअर बॅग ठेवल्या होत्या. या एअर बॅग्समुळे ती पाण्यात पडताच वरती तरंगेल आणि पोहायला सुरुवात करेल, असं वडिलांना वाटलं. पण असं झालं नाही. वडिलांनी आपल्या मुलीला पाण्यात टाकताच तिच्या हातातून दोन्ही एअर बॅग बाहेर आल्या आणि मुलगी पाण्याच्या तळाला जाऊ लागली. Viral Video: सिंह दिसताच पळत सुटला वृद्ध, पण जंगलाच्या राजाने गाठलंच अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हिडिओ व्हायरल होताच लोकांना मुलीची काळजी वाटू लागली. पाण्यात पडल्यानंतर तिचं काय झालं, हे व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं नाही. मुलगी आणि वडील स्विमिंग क्लास घेण्याच्या तयारीत असताना मुलीची आई या घटनेचा व्हिडिओ बनवत होती. ही घटना तिने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिलेल्या प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की मुलगी ठीक आहे का? मात्र, यापुढे काय झालं याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात