मराठी बातम्या /बातम्या /Viral /चिमुकली लेक खेळत होती असा खेळ; पाहून वडीलांना दरदरून फुटला घाम

चिमुकली लेक खेळत होती असा खेळ; पाहून वडीलांना दरदरून फुटला घाम

फोटो सौजन्य - SWNS

फोटो सौजन्य - SWNS

चिमुकलीच्या हातात कोणतं खेळणं नव्हतं तर...

वॉशिंग्टन, 29 सप्टेंबर : लहान मुलं खेळत (Children playing) असताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कधी कधी खेळता खेळता एखादी छोटीशी वस्तू ते नाकातोंडात घालतात (Kids playing). तर कधी अशा गोष्टीसोबत खेळतात जे त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. अशीच अमेरिकेतील एक चिमुकली खतरनाक खेळ खेळत होती (Girl playing with poisonous spider). जो पाहून तिच्या वडिलांनाही घाम फुटला.

एरिझोनाच्या टक्सनमध्ये राहणारा 36 वर्षांचा डेव्हिड लेहमॅन आपल्या 18 महिन्यांच्या चिमुकलीला खेळताना पाहून हादरलाच. ती खेळते म्हणून नाही तर ती ज्याच्यासोबत खेळत होती, ते पाहून त्याला धक्का बसला. कारण त्याची चिमुकली कोणत्या खेळण्यासोबत नाही तर चक्क मृत्यूसोबतच खेळत होती, असं म्हणण्यास हरकत नाही.

हे वाचा - हसणं दूर ही नवरी लग्नात आपलं तोंडही उघडू शकत नाही; कारण वाचून व्हाल हैराण

मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार डेव्हिडचं कुटुंब  बॅकयार्डमध्ये दुपारच्या वेळी आराम करत होतं. तिथंच डेव्हिडची लहान मुलगी खेळत होती. खेळता खेळता तिने उत्साहात आपल्या वडिलांना हाक मारली. डॅडी किडा करून ती ओरडली. डेव्हिडला वाटलं छोटासा कोणता तरी किटक असेल. पण जेव्हा त्याने स्वतः तो किटक पाहिला तेव्हा तो हादरला. कारण ज्याच्यासोबत त्याची मुलगी खेळत होती. तो एक कोळी होता आणि तो साधा कोळी नव्हे तर चक्क टारेंट्युला  (Tarantula) होता, जो विषारी कोळी आहे. सामान्यपणे उष्ण ठिकाणी हा कोळी दिसून येतो.

हे वाचा - खेळता-खेळता घसरला अन् थेट दगडावर जाऊन आदळला; चिमुकल्याचा VIDEO होतोय व्हायरल

विषारी कोळ्यासोबत आपल्या मुलीला पाहून डेव्हिड घाबरलाच. तो मोठ्याने ओरडला आणि त्याने लगेच आपल्या मुलीला त्या कोळ्यापासून दूर खेचून घेतलं आणि नंतर त्या कोळ्याला पकडून दुसरीकडे सोडलं.

First published:
top videos

    Tags: Parents and child, World news