• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • हसणं दूर ही नवरी स्वतःच्या लग्नात आपलं तोंडही उघडू शकत नाही; कारण वाचून व्हाल हैराण

हसणं दूर ही नवरी स्वतःच्या लग्नात आपलं तोंडही उघडू शकत नाही; कारण वाचून व्हाल हैराण

नवरीबाईने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 सप्टेंबर : प्रत्येक तरुणीने आपल्या लग्नाबाबत (Wedding day) काही स्वप्नं रंगवलेली असतात. लग्न (Bride)  ठरताच ती लग्नाच्या तयारीला लागते. आपण आपल्या लग्नात सुंदर दिसावं असं तिला वाटत असते. मेकअप, हेअरस्टाइल, ड्रेस, ज्वेलरी याशिवाय नववधूच्या सौंदर्यात कसली भर पडत असते तर ती तिच्या गोड हास्याची (Bride Smile). गोड स्माइल देऊन आपले क्युट फोटो यायला हवे असंही तिला वाटत असतं (Wedding Photo). पण एक नवरी मात्र इच्छा असूनही हसू शकत नाही. किंबहुना ती आपलं तोंडही उघडू शकत नाही. 29 वर्षांच्या हन्नाची ही व्यथा. लवकरच तिचं लग्न होणार आहे. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येतो आहे तसतशी तिला टेन्शन येऊ लागलं आहे. आपल्या माहेरच्यांना सोडून सासरी जाणार याचं दुःख तिला आहेच. पण वेगळ्याच अडचणीत आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण म्हणजे लग्न ज्याची तिने आतुरतेने वाट पाहली त्या क्षणात ती साधं हसून आपला आनंद व्यक्त करू शकत नाही. इतर नवरींप्रमाणे ती हसू शकत नाही किंवा फोटो क्लिक करू शकत नाही आणि याचं कारण आहे ते म्हणजे तिचे दात. हे वाचा - नवऱ्याने दिली अफेअर करायची सूट; काही दिवसांतच बायकोने दिली Shocking news हन्नाचे दात खूप विचित्र आहेत. पिवळे आणि ओबडधोबड असे तिचे दात आहे. हन्ना जेव्हा लहान होती तेव्हा दुधाचे दात पडण्याआधीच तिला आणखी नवे दात आले. दुधाचे दात पडले नाहीत आणि नवे दात त्या दातांना चिकटून राहिले. कितीही प्रयत्न केले तरी तिचे दात स्वच्छ होत नाहीत ज्यामुळे ती जेव्हा हसते तेव्हा खूप भयानक दिसते. हन्नाने आतापर्यंत खूप उपाय करून पाहिले. ती दिवसातून दोनदा ब्रश करते. पण तिच्या दातांचा पिवळा रंग जातच नाही आहे. मोठमोठ्या डेंटिस्टनेही आपले हात वर केले कारण तिच्या दातांचा फिटनेस चांगला आहे, त्यामुळे कुणी रिस्क घ्यायला तयार नाही.  आता एका डॉक्टरने तिचे दात पांढरेशुभ्र करू असं आश्वासन तिला दिलं आहे. हे वाचा - या तरुणीचं सौंदर्य पाहून पडाल प्रेमात; मात्र तिचं सत्य जाणून चक्रावून जाल या समस्येमुळे तिने आतापर्यंत अनेक पार्टी, कार्यक्रमात जाणं टाळलं पण आता स्वतःचंच लग्न आहे म्हटल्यावर काय करावं हे तिला समजत नाही आहे. तिलाही आपल्या लग्नात हसायचं आहे, फोटो काढायचे आहेत. यासाठी तिने सोशल मीडियावर मदत मागितली आहे. यावर काही उपाय आहे हे असं तिनं विचारला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: